कोरोना टेस्ट करताना आजींनी केला हाय वोल्टेज ड्रामा, Video पाहुन आवरणार नाही हसु

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 03:39 PM2022-01-12T15:39:32+5:302022-01-12T15:54:38+5:30

एका घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. यात आरटीपीसीआर टेस्ट करताना एका आजीबाईने इतका गोंधळा घातला, की त्यांचा व्हिडिओच व्हायरल (Funny Video) झाला.

old woman creates drama while doing rtpcr test video goes viral on social media | कोरोना टेस्ट करताना आजींनी केला हाय वोल्टेज ड्रामा, Video पाहुन आवरणार नाही हसु

कोरोना टेस्ट करताना आजींनी केला हाय वोल्टेज ड्रामा, Video पाहुन आवरणार नाही हसु

Next

भारतात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा (Omicron Variant) प्रसार वेगाने होत असल्याने पुन्हा एकदा लसीकरण (Corona Vaccination) आणि कोरोना चाचण्यांच्या (Corona Test) संख्येतही वाढ झाली आहे. मात्र, यातही काही लोक असे आहेत, जे कोरोनाची लस किंवा आरटीपीसीआर टेस्ट (RT-PCR Test) करण्यास भरपूर घाबरत आहेत. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. यात आरटीपीसीआर टेस्ट करताना एका आजीबाईने इतका गोंधळा घातला, की त्यांचा व्हिडिओच व्हायरल (Funny Video) झाला.

काही लोकांना समजवल्यानंतर हे समजतं, की आरटीपीसीआर टेस्ट आणि कोरोना लस सध्या आपल्यासाठी किती गरजेची आहे. मात्र, अनेक लोक असेही आहेत, ज्यांना ही बाब सहजासहजी समजत नाही. सध्या अशाच एका आजीबाईंचा व्हिडिओ समोर आला आहे. यात दिसतं की ही महिला कोरोनाची चाचणी करण्यासाठी आली आहे, यादरम्यान ती भरपूर घाबरलेली दिसत आहे. महिलेला पाहून असंच वाटतं, की ती सध्या टेस्ट करण्याच्या मूडमध्ये नाही. मात्र, तरीही हिंमत करून ती इथे येते आमि पुढे जे काही करते, ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की महिला घाबरतच खुर्चीवर बसते. यानंतर एक व्यक्ती महिलेची आरटीपीसीआर टेस्ट करू लागतो. मात्र, टेस्ट करत असताना ही महिला जोरजोरात ओरडू लागते. हे दृश्य पाहून आसपास उभा असलेले लोकही हसू लागतात.

हा मजेशीर व्हिडिओ पाहून अनेकजण कमेंट सेक्शनमध्ये आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने यावर कमेंट करत लिहिलं, आजीबाई तर एकदम लहान मुलांसारखं करत आहे. दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, कोणाची अशाप्रकारे मस्करी करणं चुकीचं आहे. याशिवाय इतरही अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.

Web Title: old woman creates drama while doing rtpcr test video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.