Video : 'जरा जरा टच मी' गाण्यावर करत होती डान्स; मागून आला कुत्रा अन्.....

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 01:23 PM2020-07-03T13:23:37+5:302020-07-03T13:27:27+5:30

टिकटॉकवरील या व्हिडीओत एक महिला डान्स करत आहे. महिला 'जरा जरा टच मी टच मी टच मी' या बॉलीवूड गाण्यावर डान्सचा व्हिडीओ बनवत होती.

OMG! Dog bites girl while making TikTok, video goes viral | Video : 'जरा जरा टच मी' गाण्यावर करत होती डान्स; मागून आला कुत्रा अन्.....

Video : 'जरा जरा टच मी' गाण्यावर करत होती डान्स; मागून आला कुत्रा अन्.....

Next

चिनी कंपनीचं टिकटॉक हे लोकप्रिय अ‍ॅप बंद होऊ आता काही दिवस झाले. पण लोकांमधील या अ‍ॅपची चर्चा काही थांबलेली नाही. यावरून हे अ‍ॅप किती लोकप्रिय होतं हे दिसून येतं. दरम्यान टिकटॉक अ‍ॅप बंद झालं असलं तरी या अ‍ॅपवरील काही डाऊनलोड केलेले व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेच विषय ठरत आहे. हा व्हिडीओ तसा जुना आहे. पण आता सोशल मीडियात पुन्हा व्हायरल होतो आहे.

टिकटॉकवरील या व्हिडीओत एक महिला डान्स करत आहे. महिला 'जरा जरा टच मी टच मी टच मी' या बॉलीवूड गाण्यावर डान्सचा व्हिडीओ बनवत होती. अचानक तिच्या मागून येतो आणि तिचा चावा घेण्याचा प्रयत्न करतो. तिच्या हे लक्षात येताच ती डान्स करायचं सोडून पळून जाते. 

हा व्हिडीओ पाहून लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलत आहे. कारण या व्हिडीओतील महिलेला डान्स करताना तिच्या आजूबाजूला काय होतंय याचं भानच नाही आणि त्यामुळेच तिला अशा क्षणाचा सामना करावा लागला. हा भन्नाट क्षण कॅमेरात कैद झाला. एक चांगली बाब ही झाली की, सुदैवाने महिलेला काही इजा झाली नाही. 

सध्या टिकटॉक अ‍ॅप बंद केल्याने अनेक यूजर्समध्ये संतापाचं वातावरण आहे. कारण अनेकांची या माध्यमातून चांगली कमाई होत होती. पण एकाएकी त्यांची कमाई बंद झाली. तसेच अनेक ग्रामीण भागातील दुर्लक्षित कलाकारांनाही एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला होता. तो आता न राहिल्याने त्यांच्यात नाराजी आहे.

थरारक व्हिडीओ! समुद्रकिनारी कपल करत होतं वेडींग फोटोशूट, मोठी लाट आली अन् त्यांना घेऊन गेली!

आरारारारा खतरनाक! तुमच्यापेक्षा आमचे रिक्षावाले भारी गाड्या उडवतात; चिनी सैनिकांच्या ड्रायव्हिंगची सोशल मीडियावर खिल्ली

Web Title: OMG! Dog bites girl while making TikTok, video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.