ख्रिसमस! हॉटेलमध्ये पाहुणा म्हणून आला, 3.6 लाखांची टीप देऊन गेला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 03:25 PM2020-12-17T15:25:41+5:302020-12-17T17:13:04+5:30
Christmas News: अमेरिकेतील एका इटालियन रेस्टॉरंटमध्ये ही घटना घडली आहे. 'अँथनी एट पैक्सॉन' रेस्टॉरंटने फेसबुकवर एक फोटो शेअर केला आहे.
२०२० हे असे वर्ष आहे जे जगाच्या इतिहासात काळ्या अक्षरांत लिहिले जाईल. कोरोनाने अवघ्या जगाला हतबल केले. लाखो उद्योग बंद पडले, करोडो लोकांच्या नोकऱ्या रोजगारावर पाणी फिरले. कोरोनाचा प्रभाव रेस्टॉरंट आणि सिनेमा हॉल्समध्ये जास्त दिसून आला आहे. सध्या सारे अनलॉक असले तरीही कमी प्रमाणावर लोक अशा ठिकाणी जमू लागले आहेत. अशावेळी अमेरिकेच्या एका रेस्टॉरंटमध्ये ख्रिसमसच्या तोंडावर एक अशी टीप दिली की लगेचच सोशल मीडियावर ती कमालीची व्हायरल होऊ लागली.
अमेरिकेतील एका इटालियन रेस्टॉरंटमध्ये ही घटना घडली आहे. 'अँथनी एट पैक्सॉन' रेस्टॉरंटने फेसबुकवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये एका कस्टमरचे बिल दाखविम्यात आले आहे. त्याने २०५ डॉलर्स म्हणजेच १५ हजारांच्या बिलावर ३.६ लाखांची टीप देऊन टाकली आहे. एबीसी वेबसाईटनुसार ही टीप जियाना दी एंजेलोला देण्यात आली होती. ती या रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम करते.
या वेबसाईटशी बोलताना जियानाने सांगितले की, मी तर कोणत्याही टीपसोबत खुश असते. मात्र, त्यांनी ५००० डॉलरचा आकडा सांगितला तेव्हा मला विश्वासच बसला नाही. मी या पैशांतून कॉलेजचे शिक्षण पूर्ण करणार आहे. उरलेले पैसे मी इतर चांगल्या कामासाठी वापरणार आहे.
या रेस्टॉरंटच्या अधिकृत फेसबुक पेजवर या ग्राहकाच्या उदारपणाचे कौतुक करण्यात आले आहे. आमच्याकडे आभार मानण्यापलिकडे शब्दच नाहीत. आमच्या स्टाफसाठी तुमचा पाठिंबा अभूतपूर्व होता. आता ख्रिसमसच्या सुट्या आमच्या स्टाफसाठी खूप चांगल्या जातील.
सोशल मीडियावरही या ग्राहकाची खूप स्तुती केली जात आहे.