छप्पर फाडके! दुकानदाराने चुकीचे तिकिट दिले; वृद्धाला लागली 15 कोटींची लॉटरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 03:55 PM2020-07-16T15:55:20+5:302020-07-16T15:56:36+5:30
अमेरिकेच्या मिशीगनमध्ये हा प्रकार घडला आहे. एका व्यक्तीने लॉटरी काऊंटरवर तिकिटे मागितली. त्याला तेथील कर्मचाऱ्याने त्याने मागितलेले तिकिट न देता चुकून दुसऱ्याच रकमेचे तिकिट दिले.
अनेकदा मागितलेल्या वस्तूपेक्षा वेगळीच वस्तू दिल्याचे प्रकार घडतात. नजरचुकीने दुसरीच वस्तू दिली जाते पण ज्याला ती मिळते त्याचे भले होते. काही महिन्यांपूर्वी अॅमेझॉनवर मागविले वेगळेच आणि आले 30 हजाराचे हेडफोन. अॅमेझॉनला कळताच त्यांनी ते त्या ग्राहकालाच ठेवण्यास सांगितल्याचा प्रकार घडला आहे. असाच काहीसा प्रकार अमेरिकेत घडला आहे. पण जो घेणारा होता तो मालामाल झाला आहे.
अमेरिकेच्या मिशीगनमध्ये हा प्रकार घडला आहे. एका व्यक्तीने लॉटरी काऊंटरवर तिकिटे मागितली. त्याला तेथील कर्मचाऱ्याने त्याने मागितलेले तिकिट न देता चुकून दुसऱ्याच रकमेचे तिकिट दिले. त्या व्यक्तीनेही ते तिकिट घेतले आणि निघून गेला. जेव्हा ही लॉटरी फुटली तेव्हा त्या व्यक्तीने तिकिट पाहिले तर आधी विश्वासच बसेना. त्याच तिकिटावर तो थोडी थोडकी नव्हे तर 15 कोटींची लॉटरी जिंकला होता.
सीएनएनच्या वृत्तानुसार ज्या व्यक्तीने ही लॉटरी जिंकली तो पत्नीची कारमध्ये हवा भरण्यासाठी आला होता. त्याने सुटे पैसे करण्यासाठी तेथील कर्मचाऱ्याकडून 10 डॉलरची लकी 7 तिकिटे मागितली. मात्र, तेथील कर्मचाऱ्याने त्याला 10 ऐवजी 20 डॉलरची तिकिटे दिली. क्लार्कच्या लक्षात येताच त्याने ती मागे देण्यास सांगितले. मात्र, त्या व्यक्तीने ती आपल्याकडे ठेवून वरचे पैसे देऊ केले. हीच तिकिटे त्याला विजयी बनवून गेली.
या 57 वर्षीय व्यक्तीने नाव सांगितले नाही. परंतू त्याने 2 दशलक्ष डॉलरच्या या लॉटरीच्या पैशांतून काय करणार हे मात्र जरूर सांगितले. त्यांनी सांगितले की ते नवीन घर घेऊ इच्छित आहेत. एकाचवेळी सर्व पैसा काढल्यास त्यांना 1.3 दशलक्ष डॉलर मिळणार. भारतीय रुपयात ही रक्कम 9 कोटी रुपये होते. जर त्या व्यक्तीने ही 20 डॉलरची तिकिटे मागे दिली असती तर त्याला लॉटली लागली देखिल नसती.
अन्य महत्वाच्या बातम्या...
चिनी स्मार्टफोन नकोय? सॅमसंगने स्वस्त Galaxy M01s लाँच केला; जाणून घ्या किंमत
कुठेय लॉकडाऊन; कुठेय मंदी! भारतातल्या सर्वांत महागड्या फ्लॅटची खरेदी; किंमत पाहून हादराल
Reliance AGM 2020: कोरोना लसीवर नीता अंबानींची मोठी घोषणा; इतिहासात पहिल्यांदाच भाषण
...तर 2 अब्जांनी पृथ्वीवरील लोकसंख्या कमी होईल; कोरोना महामारीनंतर मोठा इशारा
...तेव्हा सुशांत कुठे होता? मोदी भेटीवरून भाजपा खासदाराचा बॉलिवूडकरांना सवाल