बाप रे बाप! महिलेने हाताने पकडला इतका मोठा साप की व्हिडीओ पाहून उडेल थरकाप.....

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 04:37 PM2021-07-29T16:37:24+5:302021-07-29T16:39:43+5:30

Snake Viral Video : हा व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे याची काही माहिती मिळू शकली नाही. पण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. लोक महिलेच्या हिंमतीला दाद देत आहेत.

OMG : Video of woman catches giant snake with bare hands, you will shock | बाप रे बाप! महिलेने हाताने पकडला इतका मोठा साप की व्हिडीओ पाहून उडेल थरकाप.....

बाप रे बाप! महिलेने हाताने पकडला इतका मोठा साप की व्हिडीओ पाहून उडेल थरकाप.....

Next

एका महिलेचा विशाल साप पकडण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या क्लिपमध्ये बघू शकता की, महिला एका रूममध्ये असलेल्या सापाला पकडण्याचा प्रयत्न करत आहे. तर आजूबाजूचे लोक एका सुरक्षित ठिकाणी उभे राहून पूर्ण घटना कॅमेरात कैद करत होते. हा व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे याची काही माहिती मिळू शकली नाही. पण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. लोक महिलेच्या हिंमतीला दाद देत आहेत.

हा व्हिडीओ Mr Master या यूट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आला. मार्च महिन्यात हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत. काही लोकांनी महिलेच्या बहादुरीचं कौतुक केलं आहे तर लोकांनी व्हिडीओच्या बॅकग्राउंडला वाजत असलेल्या म्युझिकचं कौतुक केलं आहे. हे म्युझिक कशाचं आहे असंही काही लोकांनी विचारलं. (हे पण बघा : खतरनाक! तुम्ही कधी निळ्या डोळ्यांचा साप पाहिलाय का? मध्य प्रदेशातील जंगलात दिसला असा साप...)

जवळपास चार मिनिटांच्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, महिला एका काठीच्या मदतीने सापाला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. नंतर ती काठी फेकून हाताने सापाला पकडू लागते. जेव्हा ती सापाला पकडते तेव्हा रूममध्ये असलेले लोक तिला बाहेर निघण्यासाठी मार्ग देतात.. यादरम्यान साप आपला फणा काढून तिच्याकडे बघत असतो. नंतर महिला सापाला बाहेर रस्त्यावर सोडते. नंतर त्याला एका बॅगेत टाकते.
 

Read in English

Web Title: OMG : Video of woman catches giant snake with bare hands, you will shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.