रुग्णालयात पोहोचण्याआधीच होऊ लागल्या प्रसूती वेदना; कॅब ड्रायव्हर ठरला देवदूत, केलं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 11:42 AM2022-02-25T11:42:09+5:302022-02-25T16:52:02+5:30
कॅबमध्येच महिलेला लेबर पेन होताच कॅब ड्रायव्हर रेमंड टेलेसने दाम्पत्याला सांभाळून घेतलं आणि पॅनिक होऊ दिलं नाही.
मूल जन्माला येण्याच्या आनंदाच्या क्षणाची अनेक जोडपी वाट पाहत असतात. पण अनेकदा बाळाच्या जन्माच्या वेळी काही समस्या या निर्माण होतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एका गरोदर महिलेने पोटात दुखू लागताच रुग्णालयात जाण्यासाठी कॅब बूक केली. मात्र रुग्णालयात पोहोचण्याआधीच तिला प्रचंड त्रास होऊ लागला. पण याच दरम्यान कॅब ड्रायव्हर देवदूत ठरल्याची घटना समोर आली आहे, महिलेची अवस्था पाहून कॅब ड्रायव्हरने हुशारी दाखवली आणि काहीच वेळात कॅबच्या मागील सीटवरच महिलेनं बाळाला जन्म दिला.
कॅबमध्येच महिलेला लेबर पेन होताच कॅब ड्रायव्हर रेमंड टेलेसने दाम्पत्याला सांभाळून घेतलं आणि पॅनिक होऊ दिलं नाही. यासाठी नवजात बाळाच्या वडिलांनी चालकाचे खूप आभार मानले आहेत. उबर कॅब चालवणाऱ्या रेमंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक दिवस एका दाम्प्त्याने कॅब बूक केली. चालक कॅबमध्येच बसून त्यांची वाट बघत होता, इतक्यात प्रेग्नंट महिला एरिका डेविडोविच आपला पती निव याच्यासोबत आली आणि कॅबमध्ये बसली. तिला रुग्णालयात जायचं होतं.
रेमंडने हिंमत दाखवत शांततेच सगळं काही हाताळण्याचा केला प्रयत्न
रस्त्यात असतानाच महिलेची प्रकृती बिघडू लागली आणि ती जोरजोरात ओरडू लागली. ती रुग्णवाहिका बोलावण्यास सांगू लागली. ती अतिशय वेदनेत होती आणि रुग्णालय अजून दूर होतं. या परिस्थिती नेमकं काय करायचं, हेच समजत नव्हतं. याच वेळी कॅब ड्रायव्हरने सतर्कता दाखवत गाडी काही अंतरापर्यंत नेत पार्क केली. कोणाला काही कळण्याच्या आतच बाळ बाहेर येऊ लागलं होतं. अशा परिस्थितीत चालक रेमंडने हिंमत दाखवत शांततेच सगळं काही हाताळण्याचा प्रयत्न केला.
दाम्प्त्याला मोठा आधार देत धैर्याने घेतला योग्य निर्णय
काहीच पर्याय न दिसल्याने त्याने दाम्प्त्याला कॅबमध्येच एकटं सोडलं आणि कॅबच्या बाहेर वाट पाहू लागला. काहीच मिनिटांमध्ये महिलेने एका बाळाला जन्म दिला. निव आता पिता बनला आहे. त्यांचं मूल एका कॅबमध्ये जन्माला आलं आहे. कॅब चालकाने या परिस्थितीत या दाम्प्त्याला मोठा आधार देत धैर्याने योग्य निर्णय घेतला, यासाठी त्याचं सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे. बाळाच्या जन्मानंतर पुढील उपचारांसाठी त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.