Amazon वर मिळतोय एवढा डिस्काऊंट की, भिरभिराल! १० हजारांचा प्लॅस्टिक मग अन् २५,९९९ रुपयांची बादली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 11:42 AM2022-05-25T11:42:50+5:302022-05-25T11:43:04+5:30
सोशल मीडियावर एक बादली आणि मग अशाच कारणामुळे ट्रेंड करत होते. पाहा नक्की प्रकरण आहे तरी काय?
अनेकदा लोक Amazon वर चांगल्या डिस्काऊंटसाठी किंवा स्वस्त सामान मिळेल म्हणून शॉपिंग करतात. परंतु जर असं तुम्हाला अशा प्लॅटफॉर्मवर एक दोन नाहीतर तर शंभर पट महाग सामान मिळालं तर? सोशल मीडियावर असंच एक बादली या कारणामुळे ट्रेंड करत होती.
अॅमझॉनवर ही बादली डिस्काऊंटनंतरही हजोरो रुपयांना मिळत आहे. प्लॅस्टिकच्या बादलीसाठी तुम्ही किती खर्च करत असाल किंवा केलाही असेल? जास्तीतजास्त म्हणायचं तर पाचशे किंवा हजार. त्यापेक्षा अधिक नाही. परंतु अॅमेझॉनवर एक बादली हजारो रुपयांना मिळत आहे. पाहूया काय आहे हे प्रकरण.
डिस्काऊंट इतका की भिरभिराल
अॅमेझॉनवर एक बादली २८ टक्क्यांच्या डिस्काऊंटनंतरही २५,९९९ रुपयांना मिळत आहे. तर दुसऱ्या एका विक्रेत्यानं अॅमेझॉनवर दोन प्लॅस्टिक मग १० हजार रुपयांना लिस्ट केले आहे. दरम्यान, काही तांत्रिक गडबडीमुळे हे झालं असण्याची शक्यता आहे अशाही चर्चा सुरू आहेत. सध्या याबाबात कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. परंतु सोशल मीडियावर ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामुळे नेटकऱ्यांनी अॅमेझॉनलाही ट्रोल केलं आहे.
चूक कोणाची?
ही पूर्णपणे कंपनीची चूक म्हणता येणार नाही. कारण यावर विक्रेता आपल्या प्रोडक्ट्सची किंमत निश्चित करतो आणि त्या लिस्ट केल्या जातात. अॅमेझॉनवर याची मूळ किंमत २२,०८० रुपये सांगण्यात आली आहे. तसंच युझर्सना ५५ टक्क्यांच्या डिस्काऊंटनंतर ती ९९१४ रूपयांना विक्री करण्यात येत आहे. तर बादलीचीही किंमत ३५,९९० रुपये सांगण्यात आली आहे आणि २८ टक्क्यांच्या डिस्काऊंटनंतर ती २५,९९९ रुपयांना विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे.