Oops Moment with Katy Perry Viral: हॉलिवूड सिंगर कॅटी पेरी भर शोमध्ये उप्स मोमेंटची शिकार झाली; प्रेक्षकाची खतरनाक रिअ‍ॅक्शन व्हायरल झाली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 03:50 PM2022-03-29T15:50:01+5:302022-03-29T15:53:21+5:30

Oops Moment with Hollywood singer Katy Perry fans horrible Reaction: कॅटीची ही अशी पहिलीच वेळ नाहीय. तिला 2018 मध्येही अशा प्रकारच्या वॉर्डरोब मालफंक्शनला सामोरे जावे लागले होते. त्यावेळीही कॅटीने तिच्या पॅन्टचा फाटलेला भाग टेपने लपवून ठेवला होता.

Oops Moment with Hollywood singer Katy Perry in American idol goes viral; her pant torn second time, attach by cello tape | Oops Moment with Katy Perry Viral: हॉलिवूड सिंगर कॅटी पेरी भर शोमध्ये उप्स मोमेंटची शिकार झाली; प्रेक्षकाची खतरनाक रिअ‍ॅक्शन व्हायरल झाली

Oops Moment with Katy Perry Viral: हॉलिवूड सिंगर कॅटी पेरी भर शोमध्ये उप्स मोमेंटची शिकार झाली; प्रेक्षकाची खतरनाक रिअ‍ॅक्शन व्हायरल झाली

googlenewsNext

हॉलिवूड सिंगर कॅटी पेरीसोबत काल रात्री भरलेल्या स्टेजवर खळबळजनक घटना घडली. कॅटीला अमेरिकन आयडॉल शोमध्ये इंप्रॉम्प्टू परफॉर्मंन्सवेळी उप्स मोमेंटचा शिकार व्हावे लागले. गाणे गात असताना परफॉरमन्स करत असतेवेळी तिची लेदरची पँट फाटली आणि समोर बसलेले दर्शक पाहतच राहिले. हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. परंतू त्यातील एक प्रेक्षक त्यापेक्षा जास्त व्हायरल होत आहे तो त्याच्या रिअ‍ॅक्शनमुळे. 

या प्रेक्षकाची रिअॅक्शन एवढी खतरनाक होती की या आधी असाच एक फोटो इंटरनेटवर मिम्ससाठी खूप व्हायरल होत असतो. आता या फोटोची भर पडेल हे नक्की. अमेरिकन आयडॉलच्या सोमवारच्या एपिसोडमध्ये ही घटना घडली. कॅटी तिचे 'टीनएज ड्रीम' हे हिट गाणे म्हणत होती.  यावेळी ती थोडी खाली बसली आणि नको ते झाले. तिची पँट फाटली. हे पाहून प्रेक्षकांना धक्काच बसला. कॅटीच्या या उप्स क्षणावर लोक हसले. एकाचे तर तोंड आणि डोळेच उघडे राहिले. 

शोच्या जजनी हस हसत शो संपल्याचे जाहीर केले. परंतू. कॅटीने शो पुढे सुरुच ठेवला. तिने स्टेजवरूनच चिकटपट्टी मागविली. तेथील क्रूने पिवळ्या चिकटपट्टीने तिची फाटलेली पँट बंद केली. हे पाहून त्या प्रेक्षकाने पुन्हा खतरनाक रिअॅक्शन दिली. 

कॅटीची ही अशी पहिलीच वेळ नाहीय. तिला 2018 मध्येही अशा प्रकारच्या वॉर्डरोब मालफंक्शनला सामोरे जावे लागले होते. त्यावेळीही कॅटीने तिच्या पॅन्टचा फाटलेला भाग टेपने लपवून ठेवला होता.

Web Title: Oops Moment with Hollywood singer Katy Perry in American idol goes viral; her pant torn second time, attach by cello tape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.