"खिडकी उघडा, मला गुटखा थुंकायचाय", प्रवाशाची एअर होस्टेसकडे अजब मागणी, video viral

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 04:45 PM2023-01-24T16:45:33+5:302023-01-24T16:46:51+5:30

 air hostess viral video: सध्या सोशल मीडियावर विमानातील एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. 

Open the window, I want to spit gutkha Funny video of passenger and air hostess goes viral  | "खिडकी उघडा, मला गुटखा थुंकायचाय", प्रवाशाची एअर होस्टेसकडे अजब मागणी, video viral

"खिडकी उघडा, मला गुटखा थुंकायचाय", प्रवाशाची एअर होस्टेसकडे अजब मागणी, video viral

googlenewsNext

नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर विमानातील एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये प्रवासी आणि एअर होस्टेस यांच्यातील संवाद ऐकायला मिळत आहे. खरं तर हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच हसू येत आहे. संबंधित प्रवाशाने एअर होस्टेसकडे केलेली मागणी ऐकून सगळेच चकित झाले. कारण हा प्रवासी एअरहोस्टेसला विमानाची खिडकी उघडण्याची विनंती करताना दिसत आहे. प्रवाशाचे बोलणे ऐकून एअर होस्टेस आणि तिच्यासोबत बसलेल्या इतर प्रवाशांनाही हशा पिकतो.

खिडकी खोलण्याची केली मागणी 
व्हिडीओमध्ये एका आतील बाजूच्या सीटवर बसलेला मुलगा खिडकीकडे बोट दाखवतो आणि एअरहोस्टेसला म्हणतो, "एक्स्क्यूज मी, खिडकी खोला, मला गुटखा थुंकायचा आहे." खरं तर ही घटना इंडिगो एअरलाईनच्या फ्लाइटमधील आहे. व्हिडीओ पाहून लक्षात येऊ शकते की, संबंधित तरूण एअरहोस्टेससोबत मस्ती करत आहे. मुलाचे म्हणणे ऐकल्यानंतर एअर होस्टेसलाही त्याचा विनोद समजतो आणि ती देखील या क्षणाचा आनंद घेते. 

विमानातील गैरवर्तन आणि निष्काळजीपणाच्या बातम्या वारंवार समोर येत असतात. अशा स्थितीत हा व्हिडीओ नेटकऱ्यांचे खूप मनोरंजन करत आहे. नेटकरी या मजेशीर व्हिडीओचा आनंद घेत असून भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने मजेशीरपणे म्हटले की, यूपी-बिहारचे लोक विचार करत असतील, कारण त्यांना विमानाच्या प्रवासात एवढेच हवे आहे. मात्र, काही लोकांनी यूपी-बिहारच्या लोकांना टोमणे मारणाऱ्या व्हिडीओवरील कमेंटवरही आक्षेप घेतला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: Open the window, I want to spit gutkha Funny video of passenger and air hostess goes viral 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.