Optical illlusion : कोणत्या ग्लासमध्ये जास्त पाणी आहे? बरोबर उत्तर देण्यात 98 टक्के लोक ठरले अपयशी!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 03:40 PM2022-09-10T15:40:23+5:302022-09-10T15:41:39+5:30
Brain Puzzle: हा फोटो पाहून लोक हैराण झाले आहेत. कारण त्यांना यातील उत्तर शोधण्यासाठी बराच वेळ लागत आहे. या फोटोतील रहस्य असेच लोक शोधू शकतात ज्यांचा मेंदू शार्प आहे आणि ज्यांची नजर तीक्ष्ण आहे. चला तुमच्याकडे वेळ असेल करूया तुमच्या डोळ्यांची टेस्ट....
Brain Puzzle: सोशल मीडियावर मेंदूला चालना देणारे अनेक व्हिडीओ किंवा व्हायरल होत असतात. काही फोटो हे ऑप्टिकल इल्यूजन असतात. जे डोळ्यांसमोर आणि मेंदूसाठी भ्रम निर्माण करतात. अनेक पझल असलेले फोटोही व्हायरल होत असतात. असाच एक पझल फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हा फोटो पाहून लोक हैराण झाले आहेत. कारण त्यांना यातील उत्तर शोधण्यासाठी बराच वेळ लागत आहे. या फोटोतील रहस्य असेच लोक शोधू शकतात ज्यांचा मेंदू शार्प आहे आणि ज्यांची नजर तीक्ष्ण आहे. चला तुमच्याकडे वेळ असेल करूया तुमच्या डोळ्यांची टेस्ट....
काय आहे प्रश्न?
तुम्हाला या फोटोमध्ये चार काचेचे ग्लास दिसत आहेत. या सर्वच ग्लासांमध्ये पाणी भरलेलं आहे. जे एकसमान दिसत आहे. एका ग्लासमध्ये कात्री आहे, दुसऱ्या ग्लासमध्ये पिन आहे तिसऱ्या ग्लासमध्ये शार्पनर आहे आणि चौथ्या ग्लासमध्ये घड्याळ आहे. आता तुम्हाला ओळखायचं आहे की, कोणत्या ग्लासमध्ये जास्त पाणी आहे.
काय आहे उत्तर?
प्रत्येक ग्लासातील पाण्याचं प्रमाण एकसारखं दिसत आहे. पण प्रत्यक्षात असं नाहीये. जर तुम्ही डोक्यावर थोडा जोर द्याल तर समजेल की, कोणत्या ग्लासमध्ये सर्वात जास्त पाणी आहे. बारकाईने या ग्लासांकडे बघा आणि कोणत्या ग्लासमध्ये जास्त पाणी असेल हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही अनेकदा प्रयत्न करूनही कोणत्या ग्लासमध्ये जास्त पाणी आहे हे तुम्हाला समजलं नसेल तर उत्तर पुढील प्रमाणे आहे. उत्तर आहे ग्लास नंबर 2. चला जाणून घेऊ कसं.
काय आहे कारण?
हे एक वैज्ञानिक सत्य आहे. फार जास्त कठीणही नाही. जी वस्तू जड असते तिला जास्त जागा लागते आणि हलक्या वस्तूला कमी जागा लागते. ग्लासकडे काळजीपूर्वक बघितलं तर लक्षात येईल की, इतर ग्लासच्या तुलनेत नंबरच्या दोनच्या ग्लासमधील पिन सर्वात हलकी वस्तू आहे. त्यामुळे ग्लासमध्ये असलेल्या वस्तूला जागा कमी लागते. यावरून हे स्पष्ट होतं की, ग्लास नंबर 4 मध्ये पाण्याचं प्रमाण सर्वात जास्त आहे.