Optical Illusion: दगडांमध्ये लपलं आहे एक हरिण, तीक्ष्ण नजर असेल तर शोधून दाखवा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 12:19 PM2022-08-02T12:19:20+5:302022-08-02T12:22:14+5:30

Optical Illusion Test: हा फोटो पाहून लोकांचं डोकं चक्रावून गेलंय. या फोटोत एक प्राणी तुमच्या डोळ्यांसमोरच आहे. पण त्याला शोधणं सोपं नाही. या फोटोत लपलं आहे एक हरिण.

Optical illusion : A deer is hidden among the rocks can you find it | Optical Illusion: दगडांमध्ये लपलं आहे एक हरिण, तीक्ष्ण नजर असेल तर शोधून दाखवा

Optical Illusion: दगडांमध्ये लपलं आहे एक हरिण, तीक्ष्ण नजर असेल तर शोधून दाखवा

googlenewsNext

Optical Illusion Test: सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे हजारो फोटो व्हायरल होत असतात. या फोटोंमधील रहस्य उलगडण्यात अनेकांना मजा येते. कधी फोटोत लपलेला प्राणी शोधायचा असतो तर कधी फोटोत काय दिसतं यावरून तुमच्या पर्सनॅलिटीबाबतही समजतं. अशा गोष्टी लोकांना खूप आवडतात. असाच एक ऑप्टिकल फोटो सध्या व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून लोकांचं डोकं चक्रावून गेलंय. या फोटोत एक प्राणी तुमच्या डोळ्यांसमोरच आहे. पण त्याला शोधणं सोपं नाही. या फोटोत लपलं आहे एक हरिण.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑप्टिकल इल्यूजनमध्ये चारही बाजूने दगडं दिसत आहेत. भर उन्हात फोटोग्राफरने हा फोटो क्लीक केला. आता यात लपलेलं हरिण लोकांना दिसत नाहीये. तुम्हाला यात हरिण शोधायचं असेल तर तुमची नजर तीक्ष्ण असली पाहिजे. कारण यात हरिण शोधणं सोपं नाही. या दगडांमध्येच कुठेतरी हरिण लपलं आहे. आजचं चॅलेंज या दगडांमधील हरिण शोधणं आहे. 

हा एक चांगला ब्रेन टीजर असेल आणि तुमचं ऑब्जर्वेशन स्कील चांगलं करण्यासाठी तुमची याने मदत होईल. पण ज्यांचे डोळे तीक्ष्ण होतील तेच यातील हरिण शोधू शकतात. काही लोकांना काही सेकंदात हरिण सापडला. पण अनेकांना अनेक तास घालवूनही यात लपलेलं हरिण दिसलेलं नाही. तुम्हाला अजूनही हरिण दिसलं नसेल तर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. हरिण फोटोच्या अगदी मधोमध आहे. एका दगडाखाली बसलेलं आहे. 

जर तुम्हाला अजूनही यातील हरिण सापलेलं नसेल तर वरील फोटोत तुम्हाला ते दिसू शकतं.

Web Title: Optical illusion : A deer is hidden among the rocks can you find it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.