Optical Illusion: फोटोतील झुडपात लपलं आहे एक हरिण, तुमची नजर तीक्ष्ण असेल तर शोधून दाखवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 11:17 AM2022-06-10T11:17:06+5:302022-06-10T11:40:59+5:30
Optical Illusion Viral Photo: हा फोटो जंगलातील झाडा-झुडपांचा आहे आणि त्यात एक हरिण लपलं आहे. पण हे हरिण शोधणं काही सोपं काम नाही. या फोटोतील हरिण शोधण्यासाठी तुमची नजर तीक्ष्ण असणं फार गरजेचं आहे.
Optical Illusion Viral Photo: सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या ऑप्टिकल इल्यूजन फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. असाच एका ऑप्टिकल इल्यूजन फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटो एक प्राणी लपला असून लोक शोधून शोधून थकले आहेत. इतर काही फोटो असे असतात ज्यात कुठेना कुठे लपलेले प्राणी दिसतात. पण या फोटोतील हरिण शोधणं फारच अवघड झालं आहे.
हा फोटो जंगलातील झाडा-झुडपांचा आहे आणि त्यात एक हरिण लपलं आहे. पण हे हरिण शोधणं काही सोपं काम नाही. या फोटोतील हरिण शोधण्यासाठी तुमची नजर तीक्ष्ण असणं फार गरजेचं आहे. जसे की तुम्ही फोटोत बघत आहात की, सगळीकडे गवत आणि झुडपं दिसत आहेत. पण तुमच्यासाठी हेच चॅलेंज आहे. तुमच्या डोळ्यांसमोरच हरिण आहे जे तुम्हाला शोधायचं आहे. मात्र, ते काही सहजपणे दिसणार नाही. त्यासाठी तुम्हाला एकाग्रतेने आणि शांतपणे बघावा लागेल. सर्वातआधी तर तुम्ही हरणाचे डोळे शोधण्याचा प्रयत्न करा. मग त्याचं पूर्ण शरीर दिसेल.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोतील हरिण शोधण्यासाठी लोक तासंतास वेळ घेत आहेत. तर काही लोक असेही आहेत ज्यांनी काही मिनिटांमध्ये किंवा काही सेकंदात यातील हरिण शोधलं. म्हणजे त्यांची नजर तीक्ष्ण आहे असंच म्हणावं लागेल. जर तुम्हाला अजूनही हरिण दिसलं नसेल तर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. फोटोच्या उजव्या भागात बघा तुम्हाला हरिण दिसेल. फोटोग्राफर जेव्हा फोटो क्लिक करत होता तेव्हा हरिण कॅमेराकडेच बघत होतं.