Optical Illusion : आंब्यांच्या ढिगाऱ्यात लपला आहे एक पोपट, बघा तुम्हाला दिसतो का!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 02:27 PM2023-05-18T14:27:37+5:302023-05-18T14:53:02+5:30
Optical Illusion : डोळ्यांसमोरच असलेल्या या गोष्टी शोधण्यात भलेभले फेल होतात. अनेकांचा डोकं तर शोधून शोधून चक्रावून जातं. लोक हे फोटो स्वत:ही बघतात आणि इतरांनाही त्या गोष्टी शोधण्याचं चॅलेंज देतात.
Optical Illusion Photo : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये काही गोष्टी लपलेल्या असतात ज्या भ्रम निर्माण करतात. डोळ्यांसमोरच असलेल्या या गोष्टी शोधण्यात भलेभले फेल होतात. अनेकांचा डोकं तर शोधून शोधून चक्रावून जातं.
एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो समोर आला आहे. सध्या आंब्यांचा सीझन सुरू आहे. या फोटोत तुम्हाला शेकडो आंबे दिसतात. पण यात एक वेगळेपण आहे. या आंब्यांच्या मधे एक पोपट लपला आहे. हा पोपट तुम्हाला शोधायचा आहे. बराच वेळ घालवल्यानंतर काही लोक म्हणत आहेत की, आंब्यांमध्ये पोपट नाहीच तर काही लोकांनी मोठ्या मेहनतीनंतर पोपटाला शोधलं आहे.
सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला जात आहे. अनेकजण फोटो शेअर करत आपल्या मित्रांना टॅग करत आहेत. त्यांना पोपट शोधण्याचं चॅलेंज देत आहेत. या आंब्यांमध्ये एक पोपट आहे. पण आंब्यांचा आणि पोपटाचा रंग एकच असल्याने तो सहजपणे शोधता येत नाही. त्यासाठी तीक्ष्ण नजर हवी.
ज्यांची नजर तीक्ष्ण आहेत त्या काही लोकांनी आंब्यांमधील पोपटाला शोधलं आहे. जर तुम्हाला अजूनही या फोटोत पोपट सापडला नसेल तर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. या फोटोच्या लेफ्ट साइडला तुम्ही बारकाईने पाहिलं तर तुम्हाला पोपट नक्कीच दिसेल. तो अगदी आंब्यांसारखा दिसतो आहे त्यामुळे पकटन दिसत नाही. बरेचजण तर हिंट देऊनही पोपट शोधू शकत नाहीयेत.