Optical Illusion: एकसारखे दिसत असले तरी एकसारखे नाहीत हे फोटो, शोधून दाखवा फरक!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 12:39 PM2024-07-26T12:39:43+5:302024-07-26T12:50:46+5:30
Optical Illusion : एकसारख्या दिसणाऱ्या या दोन फोटोंमधील फरक शोधता शोधता तुमचं मनोरंजनही चांगलं होईल.
Optical Illusion : आम्ही तुमच्यासाठी एक ऑप्टिकल इल्यूजन चॅलेंज घेऊन आलो आहोत. याने तुमच्या डोळ्यांची टेस्ट तर होईलच सोबतच तुमच्या मेंदुची कसरतही होईल. मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि मेंदुच्या क्रिया वाढवण्यासाठी हे फोटो खूप फायदेशीर मानले जातात. एकसारख्या दिसणाऱ्या या दोन फोटोंमधील फरक शोधता शोधता तुमचं मनोरंजनही चांगलं होईल.
तुम्हाला तुमच्यासमोर एकसारखे दिसणारे दोन फोटो दिसत असतील. फोटोत तुम्हाला एक डॉगी आणि त्याच्यासमोर एका फुलांचं झाडही दिसेल. दोन्ही फोटोत गोष्टी सारख्याच दिसतात. पण सारख्या आहे नाहीत. दोन्ही फोटोंमध्ये तीन फरक आहेत. तुम्ही जर जीनिअस असाल तर नक्कीच फोटोतील तीन फरक शोधाल तेही 10 सेकंदात.
जर तुम्हाला वाटत असेल की, तुमचे डोळे खूप तीक्ष्ण आहेत आणि तुमच्या नजरेतून काहीच सूटत नाही तर तुम्ही नक्कीच 10 सेकंदाच्या आत फोटोतील फरक शोधू शकला. फक्त तुम्हाला त्यासाठी फोटो बारकाईने आणि शांत डोक्याने बघावा लागेल. तरच तुम्हाला हे चॅलेंज पूर्ण करण्यात यश मिळेल. चला तर मग लागा कामाला....
आम्हाला आशा आहे की, तुम्ही या एकसारख्या दिसणाऱ्या फोटोत तीन फरक शोधले असतील. जर ठरलेल्या वेळेत खरंच शोधले असतील तर तुम्ही जीनिअस आहात. पण जर अजूनही तुम्हाला यातील फरक दिसले नसतील तर निराश होऊ नका. कारण ते शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहोत.
वरच्या फोटोत दोन्ही फोटोतील फरक सर्कल केले आहेत.