जंगलात फिरताना दिसले वाघ, IAS ने फोटो शेअर करत विचारलं - सांगा फोटोत किती वाघ आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 03:24 PM2021-07-10T15:24:36+5:302021-07-10T15:25:16+5:30

ही पोस्ट आणखी वेगळी ठरते कारण यात एक प्रश्न विचारण्यात आला आहे की, फोटोमध्ये किती वाघ आहे. आता लोक तेच शोधत आहेत.

Optical illusion can you count the tigers in these photos shared by IAS officer | जंगलात फिरताना दिसले वाघ, IAS ने फोटो शेअर करत विचारलं - सांगा फोटोत किती वाघ आहेत?

जंगलात फिरताना दिसले वाघ, IAS ने फोटो शेअर करत विचारलं - सांगा फोटोत किती वाघ आहेत?

googlenewsNext

एका आयएएस अधिकाऱ्याने बांधवगढ टायगर रिझर्व (Bandhavgarh tiger reserve) च्या सफारी दरम्यान काढलेले वाघांचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेले हे फोटो निसर्ग आणि प्राणी प्रेमींचं लक्ष वेधून घेत आहेत. ही पोस्ट आणखी वेगळी ठरते कारण यात एक प्रश्न विचारण्यात आला आहे की, फोटोमध्ये किती वाघ आहे. आता लोक तेच शोधत आहेत.

आयएएस अधिकारी शेर सिंह मीणा (IAS officer Sher Singh Meena) यांनी हे फोटो ट्विट  केले आहेत. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं की, 'बांधवगढ टायगर रिझर्वच्या मााझ्या प्रवासादरम्यान घेतलेले फोटो. निसर्ग प्रेमी मित्रांनो फोटोत किती वाघ आहेत?'. कमेंटमध्ये त्यांनी सांगितलं की, हे फोटो जूनमध्ये घेण्यात आले होते. (हे पण बघा : जबरदस्त! बिबट्या एक शेपट्या दोन; दुसरा बिबट्या शोधून शोधून दमलेत लोक, बघा तुम्हीही ट्राय करा!)

८ जुलैला त्यांनी शेअर केलेल्या या ट्विटला आतापर्यंत ७०० पेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. 

आयएफएस अधिकारी परवीन कस्वां यांनी यावर कमेंट केली की, 'अच्छा वाला'. परवीन हे स्वत: प्राण्यांचे वेगवेगळे फोटो शेअर करण्यासाठी ओळखले जातात. एका ट्विटर यूजरने लिहिलं की, 'तुम्ही तर नशीबवान आहात. सामान्यपणे पावसाच्या दिवसात वाघ दिसणं अवघड असतं. फार छान'.

बऱ्याच लोकांनी फोटोत किती वाघ आहेत याचे वेगवेगळे अंदाज लावले. पण जास्त जणांना काही बरोबर उत्तर देता आलेलं नाही. त्यानंतर मीना यांनी आणखी एक फोटो शेअर केला आणि सांगितलं की, मुळात तिथे तीन वाघ होते.
 

Web Title: Optical illusion can you count the tigers in these photos shared by IAS officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.