Optical Illusion : या फोटोत एकूण किती आहेत कोंबड्या? 99 टक्के लोक बरोबर उत्तर देण्यात फेल...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 09:46 AM2023-05-10T09:46:10+5:302023-05-10T09:48:01+5:30
Optical Illusion : Pinterest कडून एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो शेअर करण्यात आला आहे. ज्यातील कोंबड्यांची बरोबर संख्या सांगायची आहे. फोटोमध्ये तीन लाइनमध्ये कोंबड्या दिसत आहेत.
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो आणि त्यातील रहस्य उलगडणं आवडतं सगळ्यांनाच पण ते सगळ्यांनाच जमतं असं नाही. या फोटोंच्या माध्यमातून लोक त्याची दृष्टी आणि हुशारी टेस्ट करू शकतात. यातील लपलेल्या गोष्टी शोधणं खरंच अवघड असतं. पण त्यातच खरी मजा असते. सुरूवातीला तर फोटो साधेसोपे वाटतात, पण त्यात जे दिसतं ते तसं नसतं. जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा सगळेच हैराण होतात.
Pinterest कडून एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो शेअर करण्यात आला आहे. ज्यातील कोंबड्यांची बरोबर संख्या सांगायची आहे. फोटोमध्ये तीन लाइनमध्ये कोंबड्या दिसत आहेत. पण यातील उत्तर इतकं अवघड आहे की, जास्तीत जास्त लोक कोंबड्यांची बरोबर संख्या सांगण्यात अपयशी ठरले आहेत. तुम्हाला वाटत असेल की, तुम्ही जीनिअस आहात तर 15 सेकंदात यातील कोंबड्यांची बरोबर संख्या सांगा.
फोटोमध्ये तीन वेगवेगळ्या लाइनमध्ये उभ्या कोंबड्या दिसत आहेत. कशाही मोजल्या तरी लाइनमध्ये तुम्हाला तीन तीनच कोंबड्या दिसतील. पण जर कोंबड्या मोजणं सोपं असतं तर मग चॅलेंजमध्ये काय मजा आली असती? तुम्हाला बरोबर उत्तर शोधायचं असेल तर फार बारकाईने फोटो बघावा लागेल.
पहिल्यांदा बघाल तर फोटोत तुम्हाला एकूण 9 कोंबड्या दिसतील. पण मुळात यात 9 पेक्षा जास्त कोंबड्या आहेत. फोटो बारकाईने बघाल तेव्हा तुम्हाला यात एकूण 21 कोंबड्या दिसतील. पहिल्या लाइनमध्ये 7 कोंबड्या आहेत, दुसऱ्या लाइनमध्ये 8 कोंबड्या आणि तिसऱ्या लाइनमध्ये 6 कोंबड्या आहेत. तिन्ही लाइनमध्ये कोंबड्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. खालच्या फोटोत तुम्ही उत्तर बघू शकता.