Optical Illusion: या फोटोत लपले आहेत 10 चेहरे, भलेभले शोधून थकले...बघा ट्राय करा...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 12:34 PM2023-01-11T12:34:14+5:302023-01-11T12:37:46+5:30
Optical Illusion : हे फोटो आपल्या डोळ्यांना आणि मेंदूला कन्फ्यूज करतात. असाच एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे, ज्यात तुम्हाला 10 चेहरे शोधायचे आहेत.
Optical Illusion Faces : सोशल मीडियावर नेहमीच ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. यात जे दिसतं ते नसतं. त्यात अनेक रहस्य दडलेले असतात जे तुम्हाला शोधायचे असतात. लोकांचं याने मनोरंजनही होतं आणि त्यांच्या डोळ्यांची टेस्टही होते. आपल्या मेंदूला आव्हान देणारे हे फोटो असतात. हे फोटो आपल्या डोळ्यांना आणि मेंदूला कन्फ्यूज करतात. असाच एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे, ज्यात तुम्हाला 10 चेहरे शोधायचे आहेत.
या इलस्ट्रेशनमध्ये एक जुनं रहस्य आहे. हा फोटो 1914 मध्ये द डुलुथ हेराल्डमध्ये प्रकाशित करण्यात आला होता. यात लोकांना 10 चेहरे शोधण्याचं चॅलेंज दिलं गेलं होतं. ज्यात 10 व्या व्यक्तीमध्ये लपलेले 10 चेहरे शोधायचे आहेत. जे सगळ्यात अवघड काम आहे. या फोटोला बारकाईने बघाल तरच तुम्हाला यातील इतर 10 चेहरे दिसतील.
असा दावा करण्यात आला आहे की, जर तुम्ही केवळ 21 सेकंदात यातील 10 चेहरे शोधले तर तुमचा आयक्यू लेव्हल हाय असू शकतो. स्टडीमधून समोर आलं आहे की, जेवढं तुम्ही कठिण रहस्य उलगडण्यासाठी मेंदुचा वापर करता, तेवढे तुम्ही हुशार असता. ऑप्टिकल इल्यूजन नेहमीच काहीना काही हिंट नक्कीच देतात. अशात हा फोटो तुमच्यासाठी आव्हान आहे.