मांजरीच्या एकसारख्या दिसणाऱ्या फोटोत शोधून दाखवा ३ फरक, ठराल जीनिअस!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 02:49 PM2024-09-06T14:49:39+5:302024-09-06T14:50:06+5:30
Optical Illusion : एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, ज्यात तुम्हाला तीन फरक शोधायचे आहेत. ज्यासाठी तुमच्याकडे ९ सेकंदाची वेळ आहे.
Optical Illusion : आधी वेळ घालवण्यासाठी लोक वेगवेगळ्या अॅक्टिविटीज करत होते. वेगवेगळे खेळ खेळत होते. ज्याद्वारे त्यांचा शारीरिक व्यायामही होत होता आणि त्यांच्या मेंदुला खाद्यही मिळत होतं. पण आता जास्तीत जास्त लोक फोनवर फोटो, व्हिडिओ रील्स बघण्यात वेळ घालवतात. मात्र, यावरही तुम्ही मेंदुची कसरत होईल अशा गोष्टी शोधू शकता. यातीलच एक म्हणजे ऑप्टिकल इल्यूजन फोटो.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जे आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. यांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शोधायच्या असतात. कधी यांमध्ये वस्तू किंवा प्राणी, कधी वेगळे नंबर किंवा फरक शोधायचे असतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, ज्यात तुम्हाला तीन फरक शोधायचे आहेत.
तुमच्यासमोर असलेल्या दोन फोटोमध्ये तुम्हाला एक मांजर दिसत आहे. तुमच्यासाठी चॅलेंज हे आहे की, या दोन्ही फोटोत तीन फरक आहेत जे तुम्हाला ९ सेकंदात शोधायचे आहेत. तुम्ही जर फोटो बारकाईने बघितला आणि तुमचे जर डोळे तीक्ष्ण असतील तर तुम्ही नक्कीच वेळेत यातील ३ फरक शोधू शकाल.
ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची खासियत म्हणजे या फोटोंच्या माध्यमातून तुमचा मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरत होते. सोबतच तुमची आयक्यू टेस्टही होते. त्यामुळे असे फोटो सॉल्व करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.
जर तुम्हाला ९ सेकंदात एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोतील ३ फरक दिसले असतील तर तुम्ही खरंच जीनिअस आहात. तुमचं अभिनंदन. मात्र, अजूनही दिसले नसतील तर निराशही होऊ नका. कारण यात काय फरक आहेत ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही यातील ३ फरक बघू शकता.
वरच्या फोटोत यातील फरक सर्कल केलेले आहेत.