चॅलेंज! एकसारख्या दिसणाऱ्या फोटोत शोधा ३ फरक, शोधाल तर ठराल जीनिअस!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 11:50 AM2024-10-16T11:50:20+5:302024-10-16T11:56:44+5:30
Optical Illusion : तुमच्यासमोर एकसारखे दिसणारे दोन फोटो आहेत. ज्यात तुम्हाला एक मांजर झोपलेली दिसत आहे. फोटो एकसारखे दिसत असले तरी ते एकसारखे नाहीत.
(Image Credit - Youtube)
Optical Illusion : सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. या फोटोंमधील गोष्टी शोधणं लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतं. कारण यातून चांगलं मनोरंजन होतं आणि सोबतच आयक्यू टेस्टही होते. याकारणाने बरेच लोक असे फोटो सोशल मीडियावर शेअर करून एकमेकांना चॅलेंज देत असतात. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला ३ फरक शोधायचे आहेत.
तुमच्यासमोर एकसारखे दिसणारे दोन फोटो आहेत. ज्यात तुम्हाला एक मांजर झोपलेली दिसत आहे. फोटो एकसारखे दिसत असले तरी ते एकसारखे नाहीत. त्यांमध्ये ३ फरक आहेत. जे तुम्हाला १० सेकंदात शोधायचे आहेत. मात्र, हे काम इतकं सोपंही नाही. कारण यातील ३ फरक शोधण्यासाठी तुम्हाला बरीच मेहनत करावी लागणार आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची खासियत म्हणजे हे फोटो आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. ज्यामुळे यातील गोष्टी समोर असूनही लगेच दिसून येत नाहीत. म्हणूनच या फोटोंद्वारे मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरतही होते. कारण यातील फरक शोधण्यासाठी तुम्हाला फोटो खूप बारकाईने बघावा लागतो.
जर वरच्या एकासारख्या दिसणाऱ्या फोटोत तुम्हाला ठरलेल्या वेळेत म्हणजे १० सेकंदात ३ फरक दिसले असतील तर तुम्ही खरंच जीनिअस आहात. मात्र, अजूनही फरक दिसले नसतील निराशही होऊ नका. कारण ते शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत तुम्ही यातील ३ फरक बघू शकता.
वरच्या फोटोत यातील ३ फरक सर्कल केलेले आहेत.