Optical Illusion: या फोटोत लपले आहेत 5 चेहरे, बघा महिलांचे चेहरे किती दिसत आहेत!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 12:28 PM2023-05-26T12:28:01+5:302023-05-26T12:31:03+5:30
Optical Illusion : बरेच लोक या फोटोंमधील गुपित शोधण्यात अपयशी ठरतात. असाच एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. या फोटोत एकूण पाच चेहरे आहेत. पण यूजर्सना ते काही सापडेना.
Optical Illusion : सोशल मीडियावर व्हायरल होणारे ऑप्टिकल इल्यूजन हे काही फक्त मनोरंजन करतात असं नाही तर त्यातून तुमचे डोळे आणि बुद्धीचीही टेस्ट होते. सोशल मीडियावर अलिकडे वेगवेगळ्या ऑप्टिकल इल्यूजन असलेले फोटो खूप व्हायरल होत आहेत. हे फोटो भ्रम निर्माण करणारे असतात.
या फोटोंमध्ये काहीतरी लपलेलं असतं ज्याचं उत्तर शोधायचं असतं. पण बरेच लोक या फोटोंमधील गुपित शोधण्यात अपयशी ठरतात. असाच एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. या फोटोत एकूण पाच चेहरे आहेत. पण यूजर्सना ते काही सापडेना.
काही दिवसांपासून सोशल मीडियावर यूजर्सना ऑप्टिकल इल्यूजन फोटो बघण्याची चांगलीच क्रेझ बघायला मिळत आहे. यातील काही प्रश्न सोपे तर काही कठिण असतात. जो फोटो आता व्हायरल झाला आहे, त्यातील गुपित शोधणं जरा अवघड आहे. या फोटोत एका व्यक्तीचा चेहरा दिसत आहे. पण हा फोटो दिसतो तसा अजिबात नाहीये.
या फोटोत ५ चेहरे आहेत. यातील दोन चेहरे तर तुम्हाला स्पष्टपणे दिसतात. पण इतर तीन चेहरे शोधण्यात अनेकांची हालत खराब झाली आहे. अनेकजण फोटो पुन्हा पुन्हा, तासंतास बघत आहेत. पण तरीही त्यांना यातील तीन चेहरे दिसत नाहीयेत. यातील पाच चेहऱ्यांपैकी २ चेहरे पुरूषांचे तर तीन चेहरे महिलांचे आहेत.
चला तुम्हाला प्रयत्न करूनही चेहरे दिसत नसतील. तर फोटोतील गोलांकडे बघा. तुम्हाला समजेल की, फोटोत महिलेचा चेहरा कोणता आणि पुरूषाचा चेहरा कोणता. पहिल चेहरा एका महिलेचा आहे, दुसरा चेहरा महिलेचा आहे, तीसरा चेहरा एका पुरूषा आहे, चौथा चेहराही पुरूषाचा आणि पाचवा चेहरा महिलेचा आहे. तुम्हाला चेहरे दिसले असतील तर तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा आणि त्यांना चेहरे शोधण्याचं चॅलेंज द्या.