चॅलेंज! 15 सेकंदात शोधून दाखवा फोटोतील वेगळा नंबर, ठराल जीनिअस!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 03:04 PM2024-09-07T15:04:56+5:302024-09-07T15:05:33+5:30
Optical Illusion : हे फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करत असतात. त्यामुळे असे फोटो सॉल्व करणं किंवा त्यातील गोष्टी शोधणं लहान मुलांसोबतच मोठ्यांनाही आवडतं. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
Optical Illusion : सोशल मीडिया वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल होत असतात. वेगवेगळे फोटो व्हायरल होत असतात. यातील काही फोटो हे लोकांच्या मेंदू आणि डोळ्यांची कसरत करण्यात मदत करतात. या फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन फोटो म्हणतात. हे फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करत असतात. त्यामुळे असे फोटो सॉल्व करणं किंवा त्यातील गोष्टी शोधणं लहान मुलांसोबतच मोठ्यांनाही आवडतं. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी यांमध्ये प्राणी किंवा वस्तू शोधायच्या असतात तर कधी यांमध्ये फरक किंवा वेगळे नंबर शोधायचे असतात. असाच हा फोटो आहे. ज्यात तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे. ज्यासाठी तुमच्याकडे 15 सेकंदाची वेळ आहे. फोटोत तुम्हाला सगळीकडे 55 हा नंबर दिसत आहे. मात्र, यात एक वेगळाही नंबर आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटोंच्या माध्यमातून मनोरंजन तर चांगलं होतंच. सोबतच याद्वारे मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरत होते. तसेच तुमची आयक्यू टेस्टही होते. इतकंच नाही तर फोटो बघून तुमची एकाग्रताही वाढते. म्हणूनच असे फोटो एकमेकांना शेअर करून लोक चॅलेंज देत असतात. आज हे चॅलेंज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जर तुम्हाला वाटत असेल की, तुमचे डोळे खूप तीक्ष्ण आहेत आणि तुमच्या नजरेतून काहीच सुपट नाही तर लगेच कामाला लागा.
तुम्ही जर फोटो बारकाईने बघाल तर नक्कीच तुम्हाला ठरलेल्या वेळेत म्हणजे 15 सेकंदात या फोटोतील वेगळा नंबर दिसेल. जर तुम्हाला यातील वेगळा नंबर दिसला असेल तर तुमचं अभिनंदन. पण जर अजूनही दिसला नसेल तर निराशही होऊ नका. कारण तो काय आहे आणि कुठे आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही तो बघू शकता.
वरच्या फोटो वेगळा नंबर सर्कल केला आहे.