Optical Illusion : 'या' फोटोत शोधायच्या आहेत 7 गोष्टी, केवळ 2 टक्के लोकच शोधू शकले!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 02:09 PM2024-09-03T14:09:25+5:302024-09-03T14:10:06+5:30
Optical Illusion : आज आम्ही तुमच्यासाठी एक असा फोटो घेऊन आलो आहोत ज्यात तुम्हाला तब्बल सात गोष्टी शोधायच्या आहेत.
Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. हे फोटो वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ज्यात तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शोधायच्या असतात. ज्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. सामान्यपणे काही फोटोंमध्ये तुम्हाला एक किंवा दोन किंवा तीन गोष्टी शोधायच्या असतात. पण आज आम्ही तुमच्यासाठी एक असा फोटो घेऊन आलो आहोत ज्यात तुम्हाला तब्बल सात गोष्टी शोधायच्या आहेत.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे सॉल्व करण्यासाठी फार मजेदार असतात. यांची खास बाब म्हणजे यातून तुमचा मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरत होते. कारण यातील गोष्टी शोधण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. जे लहानांसोबतच मोठ्यांना सुद्धा आवडतं. तसेच याद्वारे तुमची आयक्यू टेस्टही होते.
तुमच्यासमोर असलेल्या फोटोत जर तुम्हाला 7 गोष्टी 15 सेकंदात दिसल्या असतील तर तुम्ही अशा फार कमी लोकांमध्ये आहात ज्यांना हे जमलं. जर तुम्हाला केवळ 15 सेकंदात जर यातील गोष्टी दिसत नसतील तर तुम्ही जास्तही वेळ घेऊ शकता. ही फक्त तुमच्या मेंदूची आणि डोळ्यांची टेस्ट आहे. जर तुम्हाला यातील गोष्टी सापडत नसतील तर आम्ही काही हिंट देतो. एका बागेत ब्लॅक अॅन्ड व्हाईट स्केच आहे. जिथे एक खारूताई खेळत आहे. एक पक्षी झाडाच्या फांदीवर बसला आहे. यात इल्यूजन आपल्याला खूपसारी झाडांची पाने, प्राणी आणि गवत दिसतं आणि 7 गोष्टी ज्या लपल्या आहेत.
या ऑप्टिकल इल्यूजनमधील लपलेल्या गोष्टी शोधणं तुमच्यासाठी एक चॅलेंज आहे. हा दावा करण्यात आला आहे की, केवळ 2 टक्के लोक यातील लपलेल्या गोष्टी शोधू शकले आहेत. जर तुम्हाला या फोटोत लपलेल्या गोष्टी शोधण्यास अडचण येत असेल तर त्या शोधण्यासाठी एक आयडिया आहे. एका झाडावर खारूताई खेळत दिसत असेल तर यावरून हे दिसून येतं की, तुमची नजर किती तीक्ष्ण आहे. जर तुम्हाला अनेक प्रयत्न करूनही यातील लपलेल्या गोष्टी दिसत नसतील तर आणखी काही हिंट देतो. यात मासा, ट्यूलिप, आयस्क्रीम, बॉल, कलर पेन्सिल, चमचा आणि चंद्र शोधायचा आहे.