चॅलेंज! ३० सेकंदात शोधा फोटोतील ८ फरक, भलेभले लोक शोधून थकले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 01:04 PM2024-08-17T13:04:54+5:302024-08-17T13:31:16+5:30

Optical Illusion : एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला केवळ १, २ किंवा ३ नाही तर तब्बल ८ फरक शोधायचे आहेत.

Optical Illusion : Can you find 8 difference in this photo in 30 second | चॅलेंज! ३० सेकंदात शोधा फोटोतील ८ फरक, भलेभले लोक शोधून थकले...

चॅलेंज! ३० सेकंदात शोधा फोटोतील ८ फरक, भलेभले लोक शोधून थकले...

Optical Illusion : वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. हे फोटो सॉल्व करणं किंवा यातील रहस्य उलगडणं लहानांसोबतच मोठ्यांनाही आवडतं. म्हणूनच असे फोटो सोशल मीडियावर एकमेकांना पाठवून चॅलेंज दिलं जातं. असाच फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला केवळ १, २ किंवा ३ नाही तर तब्बल ८ फरक शोधायचे आहेत.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी या फोटोंमध्ये प्राणी किंवा वस्तू शोधायचे असतात तर कधी फोटोत वेगळा नंबर किंवा फरक शोधायचे असतात. असाच हा फोटो आहे. ज्यात तुम्हाला एका लायब्ररीचं दृश्य दिसत आहे. यात एक लाल ड्रेस घातलेली महिला आणि मागे दोन व्यक्ती पुस्तकं बघत आहेत. दोन्ही फोटो एकसारखे दिसतात. पण ते एकसारखे नाहीत त्यांमध्ये ८ फरक आहेत. तेच तुम्हाला ३० सेकंदात शोधायचे आहेत.

असे फोटो आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करत असतात. म्हणजे यातील गोष्टी सहजपणे दिसत नाहीत त्या शोधाव्या लागतात. महत्वाची बाब म्हणजे या फोटोंच्या माध्यमातून मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरतही होते. तसेच या फोटोंद्वारे आपली आयक्यू टेस्टही होते. त्यामुळेच असे फोटो खूप व्हायरल आणि लोकप्रिय होतात.

तुमच्यासमोर असलेल्या एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोतील ८ परक तुम्हाला दिसले असतील तर तुम्ही खरंच जीनिअस आहात. कारण एक दोन नाही तर तब्बल ८ फरक शोधायचे होते. तुमचे डोळेही खूप तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही दिसले नसतील तर निराशही होऊ नका. कारण यात ८ फरक काय आहेत ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही हे फरक बघू शकता.

वरच्या फोटोत ८ फरक सर्कल केलेले आहेत. 

Web Title: Optical Illusion : Can you find 8 difference in this photo in 30 second

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.