हा फोटो पाहून चक्रावलं लोकांचं डोकं, पण वाघ काही दिसेना; तुम्हीही ट्राय करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 12:23 PM2023-11-21T12:23:22+5:302023-11-21T12:26:59+5:30
Optical Illusion : आज असाच एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्याद्वारे तुम्ही मेंदुची कसरत करू शकता.
Optical Illusion IQ Test: ऑप्टिकल इल्यूजन एकप्रकारची मेंदुची कसरत आहे. अनेक लोक हे सॉल्व करण्याचा आनंद घेतात. हे सॉल्व केल्याने मेंदुही शार्प होतो. सोबतच विचार करण्याची क्षमता आणि स्मरणशक्तीही वाढते. यामुळेच सोशल मीडियावर आजकाल खूपसारे ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात.
आज असाच एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्याद्वारे तुम्ही मेंदुची कसरत करू शकता. या फोटोत एक वाघ लपलेला आहे. ज्याला तुम्हाला शोधायचं आहे. यासाठी तुम्हाला एक ठराविक वेळ देण्यात आली आहे. 7 सेकंदात तुम्हाला या फोटोतील वाघ शोधायचा आहे. जर 7 सेकंदात तुम्ही यातील वाघ शोधला तर तुम्ही जीनिअस ठराल.
तुमच्यासमोर असलेल्या फोटोमध्ये तुम्हाला हिरवीगार झाडी आणि जमिनीवर गवत दिसत आहे. जंगलाचा हा फोटो फारच सुंदर आहे. फोटोत झाडांमध्येच एक वाघ लपलेला आहे. पण तो सहजपणे दिसत नाही. जर तुम्ही 7 सेकंदात या फोटोतील वाघ शोधला असेल तर खरंच तुमचे डोळे खूप तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही वाघ दिसला नसेल तर निराश होण्याची गरज नाही. कारण त्याला शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत त्याला तुम्ही बघू शकता.