Optical Illusion: झाडाच्या खोडावर बसली आहे एक मांजर, भले भले शोधून थकले; तुम्हीही ट्राय करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 11:38 AM2023-04-25T11:38:42+5:302023-04-25T11:41:15+5:30
Optical Illusion : एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात दावा करण्यात आला आहे की, जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तरच तुम्ही यात लपलेली मांजर शोधू शकाल.
Optical Illusion Find A Cat : सोशल मीडियावर नेहमीच बुद्धीला भ्रमीत करणारे ऑप्टिकल इल्यूजन व्हायरल होत असतात. पण हे ऑप्टिकल इल्यूजन केवळ मनोरंजनासाठी नाही तर तुमची एखाद्या गोष्टीकडे बघण्याची क्षमता यातून जाणून घेता येते. तुमचं डोकं रिफ्रेश होतं. या फोटोंनी बुद्धीला चालनाही मिळते. ऑप्टिकल इल्यूजन नेहमीच लोकांना मोहीत करतात. या फोटोतून असं आव्हान मिळतं ज्यामुळे मेंदुवर जोर द्यावा लागतो.
असाच एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात दावा करण्यात आला आहे की, जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तरच तुम्ही यात लपलेली मांजर शोधू शकाल. एका झाडाच्या खोडावर ही मांजर बसलेली आहे. पण तिला शोधण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे. तुमचं ऑब्जर्वेशन स्किल वाढवावं लागणार आहे. तुमच्याकडे ही मांजर शोधण्यासाठी केवळ 10 सेकंदाचा वेळ आहे. आम्ही काही बघायला येणार नाही, पण तुमचं तुम्ही असं ठरवा.
फोटोत असलेली मांजर शोधणं काही सोपं काम नाही. कारण ती झाडाच्या खोडाच्या रंगात पूर्णपणे मिक्स झाली आहे. त्यामुळे तिला शोधण्यासाठी तुम्हाला खूप बारकाईने फोटो बघावा लागेल. तेव्हाच तुम्ही तिला शोधू शकाल. तुमच्या धीर असेल आणि तीक्ष्ण नजर असेल तरच ती दिसू शकेल. ज्यांना यातील मांजर दिसली असेल त्यांचं अभिनंदन पण ज्यांना अजूनही मांजर दिसली नाही त्यांच्यासाठी खाली उत्तर दिलं आहे.