चॅलेंज! 10 सेकंदात शोधून दाखवा फोटोतील वेगळा नंबर, शोधाल तर ठराल जीनिअस!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 12:46 PM2024-08-02T12:46:14+5:302024-08-02T12:47:09+5:30
Optical Illusion : तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला सगळीकडे 208 हा नंबर दिसत आहे. पण यात केवळ 208 च नाही तर एक वेगळा नंबर आहे. तो म्हणजे 280.
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर आजकाल खूप व्हायरल होत असतात. कन्फ्यूज करणारे असे फोटो सोशल मीडियावर शेअर करून लोक एकमेकांना चॅलेंज देत असतात. लहान असो वा मोठे सगळ्यांनाच असे फोटो सॉल्व करणं आवडतं. असााच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. कधी या फोटोंमध्ये तुम्हाला प्राणी शोधायचे असतात तर कधी काही वस्तू शोधायच्या असतात. तर कधी कधी अशा फोटोंमध्ये वेगळे नंबर शोधायचे असतात. या फोटोंमध्ये हे वेगळे नंबर अशा पद्धतीने लपवायचे असतात की, ते सहजपणे दिसून येत नाही. ते शोधण्यासाठी फोटो बारकाईने बघावे लागतात. आता तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला सगळीकडे 208 हा नंबर दिसत आहे. पण यात केवळ 208 च नाही तर एक वेगळा नंबरही आहे. तो म्हणजे 280.
फोटोतील 280 हा नंबर तुम्हाला 10 सेकंदाच्या आत शोधायचं आहे. चला तर मग लागा कामाला. कारण तुमच्याकडे वेळही कमी आहे आणि कामही वाटतं तेवढं सोपं नाही. त्यामुळे फोटो बारकाईने बघा आणि यातील वेगळा नंबर शोधा. जर तुमची डोळे तीक्ष्ण असतील तर तुम्ही नक्कीच ठरलेल्या वेळेत यातील वेगळा नंबर शोधू शकाल.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करत असतात. म्हणजे यात जे समोर असतं ते सहजपणे दिसत नाही. ते तुम्हाला फोटो बारकाईने बघून शोधावं लागतं. या फोटोंची एक चांगली बाब म्हणजे या फोटोंच्या माध्यमातून मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरतही होते. तसेच तुमची आयक्यू टेस्टही होते.
जर तुम्हाला 10 सेकंदात फोटोतील वेगळा नंबर सापडला असेल तर तुमचं अभिनंदन. मात्र अजूनही तुम्हाला जर वेगळा नंबर सापडला नसेल तर निराशही होऊ नका. कारण शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही यातील वेगळा नंबर बघू शकता.
फोटोतील वेगळा नंबर सर्कल केलेला बघू शकता.