MINE च्या गर्दीत १० सेकंदात शोधून दाखवा वेगळा शब्द, शोधाल तर ठराल जीनिअस!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 02:52 PM2024-09-02T14:52:50+5:302024-09-02T14:54:37+5:30
Optical Illusion : आता तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला सगळीकडे MINE असा इंग्रजी शब्द दिसत आहे. पण गमतीची बाब म्हणजे यात केवळ MINE हाच शब्द नसून NINE असाही एक शब्द आहे.
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. हे फोटो वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ऑप्टिकल इल्यूजन फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. ज्यामुळे यातील गोष्टी समोरच असूनही सहजपणे दिसत नाहीत. त्या शोधण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा शब्द शोधायचा आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची खासियत म्हणजे यातून तुमचं मनोरंजन तर होतंच, सोबतच यातून मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरतही होते. कारण यात तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शोधण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. आता तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला सगळीकडे MINE असा इंग्रजी शब्द दिसत आहे. पण गमतीची बाब म्हणजे यात केवळ MINE हाच शब्द नसून NINE असाही एक शब्द आहे. जो तुम्हाला १० सेकंदात शोधायचा आहे.
डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणारे हे ऑप्टिकल इल्यूजन फोटो वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ज्या तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शोधायच्या असतात. कधी यात प्राणी किंवा वस्तू शोधायच्या असतात. तर कधी यात तुम्हाला फरक किंवा वेगळे शब्द वा नंबर शोधायचे असतात. असाच हा फोटो आहे. जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील आणि तुम्ही जीनिअस असाल तर लगेच यातील वेगळा शब्द शोधू शकाल.
जर तुम्ही १० सेकंदात या फोटोतील वेगळा शब्द म्हणजे NINE हा शब्द शोधला असेल तर तुम्ही खरंच जीनिअस आहात आणि तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही यातील वेगळा शब्द दिसला नसेल तर निराश होऊ नका. कारण तो शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहोत. तो कुठे आहे हे खालच्या फोटोत बघू शकता.
वरच्या फोटोत वेगळा शब्द हायलाईट केला आहे.