Optical Illusion: सुकलेल्या पानांमध्ये लपला आहे एक डॉगी, पण शोधणं आहे कठिण!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 09:37 AM2022-12-02T09:37:16+5:302022-12-02T09:38:47+5:30
Optical Illusion Challenge: अशाप्रकारच्या ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमधून तुम्हाला तुमचं ऑब्जर्वेशन स्किलही चेक करता येतं. पण त्यासाठी डोकं शांत आणि नजर तीक्ष्ण असावी लागते.
Optical Illusion Challenge: ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो आपल्या डोळ्यांसमोर भ्रम तयार करतात. म्हणजे यात समोरच असलेल्या गोष्टी दिसून येत नाहीत. त्यासाठी तीक्ष्ण नजर हवी तेव्हाच ते दिसतं. आता या फोटोत तुम्हाला एक डॉगी शोधायचा आहे. ज्यासाठी तुमच्याकडे केवळ 15 सेकंदाचा वेळ आहे. अशाप्रकारच्या ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमधून तुम्हाला तुमचं ऑब्जर्वेशन स्किलही चेक करता येतं. पण त्यासाठी डोकं शांत आणि नजर तीक्ष्ण असावी लागते.
सोशल मीडियावर बरेच लोक असे ऑप्टिकल इल्यूजन पजल्स सॉल्व करण्याचा आनंद घेतात. याने त्यांचा चांगला वेळही जातो आणि त्यांचं ऑब्जर्वेशन स्किलही जाणून घेता येतं. सध्या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये तुम्हाला झाडांची वाळलेली काही पाने दिसत आहेत. ज्यात एक डॉगी लपलेला आहे. ज्याला तुम्हाला शोधायचं आहे. पण हे काही सोपं काम नाही. कारण तो समोरच आहे, पण लगेच दिसणार नाही.
या फोटोत झाडांच्या पानांसोबत काही घरे, एक गाडी आणि एक झाड दिसत आहे. तर समोर वाळलेल्या पानांचा ढिगारा पडलेला आहे. ज्यात डॉगी आहे. हा डॉगी शोधण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाइलमध्ये 15 सेकंदाचा टायमर लावा. यात तुम्हाला डॉगी कुठेही दिसू शकतो. जर अनेक प्रयत्न करूनही तुम्हाला यातील डॉगी दिसला नसेल तर खाली उत्तर दिलं आहे.