Optical illusion : या फोटोत आहेत 5 रिकाम्या बॉटल, फक्त तीक्ष्ण नजर असलेलेच शोधू शकतील...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 12:11 PM2022-10-05T12:11:15+5:302022-10-05T12:13:34+5:30

Optical Illusion : एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोत तुम्हाला काहीतरी शोधायचं आहे.

Optical illusion : Can you find the five empty bottles in the pictures | Optical illusion : या फोटोत आहेत 5 रिकाम्या बॉटल, फक्त तीक्ष्ण नजर असलेलेच शोधू शकतील...

Optical illusion : या फोटोत आहेत 5 रिकाम्या बॉटल, फक्त तीक्ष्ण नजर असलेलेच शोधू शकतील...

Next

Find the Five Bottles: अलिकडे लोकांना ऑप्टिकल इल्यूजन फोटोतील रहस्य उलगडण्यात चांगली मजा येते. सोशल मीडियावर असे कन्फ्यूज करणारे अनेक ऑप्टिकल इल्यूजन फोटो आणि व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. ज्यामुळे आपल्या मेंदूची आणि नजरेची टेस्ट करता येते. हे फोटो आपल्याला सांगतात की, जे दिसतं ते नसतं. असाच एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोत तुम्हाला काहीतरी शोधायचं आहे.

या फोटोत पाण्यात बऱ्याच बॉटल तरंगताना दिसत आहेत. या बॉटल भरलेल्या दिसत आहेत. यातील खास बाब म्हणजे यातील पाच बॉटल रिकाम्या आहेत आणि त्याच तुम्हाला शोधायच्या आहेत. ऑप्टिकल इल्यूजनचा हाच फोटो लोकांना हैराण करत आहे. कारण या रिकाम्या बॉटल शोधणं काही सोपं काम नाही. त्यासाठी तुम्हाला खूप बारकाईने त्यांचा शोध घ्यावा लागणार  आहे.

या फोटोची आणखी एक मजेदार बाब म्हणजे यातील सर्व बॉटलची साइज मिळतीजुळती आहे. त्यामुळे रिकाम्या बॉटल शोधणं सोपं काम नाही. यासाठी तुम्ही केवळ 20 सेकंदाचा वेळ घ्या. तेव्हाच तुम्ही जीनिअस ठराल. 
या फोटोत तीन डॉल्फिनही बॉटलच्या आसपास दिसत आहेत. ज्यातील एकाने चष्मा लावला  आहे. तर काही वाचताना दिसत आहेत. या फोटोच्या माध्यमातून समुद्रात कचरा न फेकण्याचा संदेश देण्यात आला आहे.
 

Web Title: Optical illusion : Can you find the five empty bottles in the pictures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.