Optical Illusion: जंगलाच्या चित्रात दडलंय एक हरिण, शोधून दाखवा! ९९ टक्के लोक ठरले अपयशी...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 05:06 PM2022-10-25T17:06:11+5:302022-10-25T17:08:34+5:30
ऑप्टिकल इल्युजनशी संबंधित सोशल मीडियावर हल्ली अनेक फोटो व्हायरल होत असतात. अशी चित्रं की जी आपल्या नजरेला गोंधळात टाकतात आणि मन विचलित करण्याचं काम करतात.
ऑप्टिकल इल्युजनशी संबंधित सोशल मीडियावर हल्ली अनेक फोटो व्हायरल होत असतात. अशी चित्रं की जी आपल्या नजरेला गोंधळात टाकतात आणि मन विचलित करण्याचं काम करतात. म्हणजे आपण जे पाहातोय ते सत्य आहे असा आपला एकंदर समज असतो. पण चित्रात दडलेली एखादी वस्तू किंवा गोष्ट शोधून दाखवणं या ऑप्टिकल इल्यूजनचं खरं आव्हान असतं. ऑप्टिकल इल्युजन असलेल्या चित्रात डोळ्यांसमोर असूनही काही गोष्टी आपल्याला सहज त्यात दिसत नाहीत. सध्या असंच एक जंगलाचं चित्र सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहे.
एक जंगलाचं चित्र आहे. ज्यामध्ये एक हरिण लपलेलं आहे. पण ते लोकांना सहजासहजी दिसत नाही. हे चित्र पाहिल्यानंतर नेटिझन्सचा गोंधळ उडाला आहे. कलाकारानं हरिण इतक्या हुशारीनं लपवलं आहे की ते तुमच्या डोळ्यांसमोर असूनही तुम्हाला ते दिसणार नाही. या चित्रासह आणखी एक दावा केला जात आहे की ९९ टक्के लोक हरिण शोधण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे तुमची दृष्टी इतरांपेक्षा जास्त तीक्ष्ण आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे आव्हान नक्कीच स्वीकारू शकता. खरं आव्हान असं आहे की या चित्रात दडलेलं हरिण तुम्हाला ७ सेकंदात शोधून दाखवायचं आहे. तर तुमची वेळ सुरू होत आहे आता...
जंगलाच्या या चित्रात हरिण नेमकं कुठं लपलं आहे हे लोकांना सहज लक्षात येत नाही. जर तुम्हाला ७ सेकंदात हरिण सापडले तर समजून घ्या की तुम्ही हुशार आहात आणि तुमची नजरही तीक्ष्ण आहे. चित्रात लपलेल्या हरणाचा रंग जंगलातील झाडे आणि वनस्पतींसारखाच आहे. यामुळे सहजासहजी ते दिसून येत नाही. आता अजूनही जर तुम्हाला चित्रात दडलेलं हरिण सापडलं नसेल तर चिंता करु नका. याचं उत्तर देखील आम्ही तुम्हाला देत आहोत. खालील चित्रात तुम्हाला लपलेलं हरिण सहज लक्षात येईल.