जीनिअस असाल तर शोधून दाखवा फोटोतील 24 नंबर, 7 सेकंदाची आहे तुमच्याकडे वेळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 11:32 AM2024-05-25T11:32:27+5:302024-05-25T11:33:15+5:30
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो आपल्यासमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे या फोटोंमध्ये लपलेल्या किंवा लपवलेल्या गोष्टी सहजपणे दिसत नाहीत.
Optical Illusion : सोशल मीडियावर वेगवेगळे माइंड गेम्स खेळायला मिळतात. ज्यांद्वारे तुमच्या डोळ्यांची टेस्ट होते आणि मेंदुचीही टेस्ट होते. याच गेम्सपैकी एक म्हणजे ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमधील गोष्टी शोधणं. सोशल मीडियावर अनेक ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. कारण यातून मेंदुची चांगली कसरतही होते. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो आपल्यासमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे या फोटोंमध्ये लपलेल्या किंवा लपवलेल्या गोष्टी सहजपणे दिसत नाहीत. त्या तुम्हाला शोधाव्या लागतात. पण त्यासाठी तुमच्याकडे तीक्ष्ण डोळे असणं गरजेचं आहे. बरेच लोक तासंतास या फोटोतील गोष्टी शोधतात तरीही त्यांना त्या दिसत नाहीत. हीच या फोटोंची खरी गंमत आहे. आता आम्ही तुमच्यासाठी आणलेल्या फोटोत तुम्हाला 24 हा नंबर शोधायचा आहे.
फोटोत तुम्ही बघू शकता की, खूपसारे 24 नंबर लाइनमध्ये उलटे दाखवले आहेत. पण यात एक 24 नंबर सरळ आहे. तोच तुम्हाला शोधायचा आहे. तो शोधण्याचं हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे केवळ 7 सेकंदाची वेळ आहे. 7 सेकंदात जर तुम्ही यातील 24 नंबर शोधला तर तुम्ही जीनिअस ठराल.
जर तुम्हाला या फोटोतील 24 नंबर दिसला असेल तर तुमचं खूप खूप अभिनंदन. पण जर तुम्हाला अजूनही यातील सरळ असलेला 24 नंबर दिसला नसेल तर निराशही होऊ नका. कारण तो कुठे आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा नंबर कुठे आहे ते तुम्ही खालच्या फोटोत बघू शकता.