9 सेकंदात या फोटोतील आयफोन शोधण्याचं आहे चॅलेंज, अनेकजण झाले फेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 02:32 PM2024-02-02T14:32:08+5:302024-02-02T14:35:04+5:30
Optical Illusion : एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला 9 सेकंदात एक आयफोन शोधायचा आहे.
Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. जे मेंदू आणि डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. हे फोटो बघणं आणि त्यातील रहस्य उलगडणं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतं. कारण यातून मनोरंजनही होतं आणि मेंदुची कसरतही होते. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला 9 सेकंदात एक आयफोन शोधायचा आहे.
या फोटोतील आयफोन शोधण्यासाठी तुम्हाला फोटो फार बारकाईने बघावा लागेल. यासाठी आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. बारकाईने कार्पेटवर ठेवलेल्या पांढऱ्या टेबलकडे बघा. हे चॅलेंज जिंकण्यासाठी तुमच्याकडे तीक्ष्ण डोळे असले पाहिजे. असे गेम खेळल्याने तुमचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोनही चांगला होतो.
फोटोत बारकाईने बघितल्यावर तुम्हाला कार्पेटवर ठेवलेल्या पांढऱ्या टेबलच्या कोपऱ्यात आयफोन दिसेल. जर 9 सेकंदात तुम्हाला यातील आयफोन दिसला असेल तर तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत आणि तुम्ही जीनिअस आहात.
जर तुम्हाला अजूनही यातील आयफोन दिसला नसेल तर निराश होऊ नका. तो शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत तुम्ही याचं उत्तर बघू शकता.