चॅलेंज! अनेकजण शोधून शोधून थकले या फोटोतील एक चूक, बघा तुम्ही शोधून दाखवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 12:27 PM2024-05-29T12:27:50+5:302024-05-29T12:28:19+5:30
Optical Illusion : आज आम्ही ऑप्टिकल इल्यूजनचा असाच एक फोटो घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक चूक शोधायची आहे.
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटोमधील लपलेल्या गोष्टी शोधणं किंवा फरक शोधणं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतं. त्यामुळेच आजकाल सोशल मीडियावर अनेक ऑप्टिकल इल्यूजन चॅलेंज शेअर केले जातात. हे फोटो आयक्यू टेस्ट करण्याची एक चांगली पद्धत मानले जातात. कारण या फोटोतील गोष्टी शोधण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागते आणि तुमच्याकडे एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन हवा असतो. आज आम्ही ऑप्टिकल इल्यूजनचा असाच एक फोटो घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक चूक शोधायची आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची सगळ्यात चांगली बाब म्हणजे या फोटोंमधील गोष्टी शोधण्याच्या माध्यमातून तुमच्या मेंदुची आणि डोळ्यांची चांगली कसरत होते. हे फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणारे असतात. ज्या गोष्टी आपल्या डोळ्यांसमोर असतात त्या लगेच दिसत नाहीत. त्या तुम्हाला बारकाईने बघून शोधाव्या लागतात. या फोटोबाबतही तेच आहे. या फोटोत तुम्हाला एक चूक शोधायची आहे.
फोटोत तुम्हाला समुद्र किनारा, सूर्य नारळाची झाडे, बोट, एक आराम खुर्ची, त्यावर एक व्यक्ती, बॉल, बकेट अशा गोष्टी दिसत आहेत. बाजूला मोठाले दगडही दिसत आहेत. पण या सगळ्यात एक चूक आहे. जी शोधण्यासाठी तुमच्या केवळ 10 सेकंदाची वेळ आहे. तसा तर हा फोटो फारच सोपा वाटतो. पण यातील चूक शोधण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे आणि डोकंही चालवावं लागणार आहे. तुम्ही जर जीनिअस असाल तर तुम्हाला लगेच यातील चूक सापडेल.
जर तुम्हाला 10 सेकंदात या फोटोतील एक चूक सापडली असेल तर तुम्ही खरंच जीनिअस आहात. पण जर अजूनही तुम्हाला यातील चूक सापडली नसेल तर निराश होऊ नका. तुम्हाला दुसऱ्या एखाद्या चॅलेंजमध्ये यश मिळेल. सध्या या फोटोत काय चूक आहे ती तुम्ही खालच्या फोटोत बघू शकता.