Optical Illusion: या फोटोत लपले आहेत दोन प्राणी, भलेभले शोधून थकले, तुम्हीही ट्राय करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 01:18 PM2022-08-17T13:18:49+5:302022-08-17T13:19:09+5:30
Optical Illusion : हे फोटो तुमच्या नजरेची परीक्षण करण्यासाठी आणि तुमच्या बुद्धीची टेस्ट घेण्यासाठी फायदेशीर ठरतात. या ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमुळे आपलं बरंच मनोरंजनही होतं. आम्ही तुम्हाला दाखवत असलेल्या फोटोमध्ये दोन प्राणी आहेत जे तुम्हाला शोधायचे आहेत.
Optical Illusion Viral Photo : सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजन असलेले फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. हे फोटो बघून लोक एकतर हैराण होतात नाही तर चक्रावून जातात. कारण या फोटोतजे दिसतं ते नसतं. त्यात काहीतरी रहस्य किंवा प्रश्न दडलेले असतात. अशात हे फोटो तुमच्या नजरेची परीक्षण करण्यासाठी आणि तुमच्या बुद्धीची टेस्ट घेण्यासाठी फायदेशीर ठरतात. या ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमुळे आपलं बरंच मनोरंजनही होतं. आम्ही तुम्हाला दाखवत असलेल्या फोटोमध्ये दोन प्राणी आहेत जे तुम्हाला शोधायचे आहेत.
या तुम्हाला किती आणि कोणते प्राणी दिसत आहेत हे शोधायचं आहे. पहिल्यांदा हा फोटो बघाल तर यात तुम्हाला केवळ एकच प्राणी दिसेल, पण ते तसं नाहीये. फोटोत डोळ्यांना भ्रम निर्माण होतो. यात जरा मजाही आहे. कारण जर तुम्हाला एकच प्राणी दिसत असेल तर दुसरा शोधायला तुम्हाला बरीच मेहनत करावी लागणार आहे. तुम्हाला दुसरा प्राणी दिसला नसेल तर एक हिंटही आम्ही देतो. त्यासाठी तुम्ही हत्तीच्या सोंडेकडे बारकाईने बघा. कदाचित तुम्हाला तुमचा दुसरा प्राणीही दिसेल.
या फोटोत आधी तुम्हाला एक हत्ती दिसेल, पण त्यातच एक दुसरा प्राणीही लपला आहे. दुसरा प्राणी शोधण्यासाठी तुम्हाला तीक्ष्ण नजर असण्याची गरज आहे. बारकाईने बघाल तरच तुम्हाला तो दुसरा प्राणी दिसू शकेल. बऱ्याच लोकांनी प्रयत्न केला पण त्यांना काही यातील दुसरा प्राणी शोधणं जमलं नाही. तुम्ही हे ट्राय करू शकता.
जर तुम्हाला अनेक प्रयत्न करूनही यातील दुसरा प्राणी दिसला नसेल तर त्यासाठी तुम्हाला फोटो उलटा करावा लागेल. तेव्हाच तुम्हाला दुसरा प्राणी दिसू शकेल.
हा फोटो एका जाहिरातीसाठी तयार करण्यात आला होता. या जाहिरातीने जाहिरात इंडस्ट्रीत वादळ आणलं होतं. हा फोटो आंतरराष्ट्रीय जाहिरात एजन्सी लियो बर्नेटद्वारे तयार करण्यात आला होता.