Optical Illusion: या फोटोत आहेत दोन वेगवेगळे जीव, दुसरा शोधाल तर आनंदाने उड्या माराल!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 11:38 AM2022-04-07T11:38:57+5:302022-04-07T11:42:15+5:30
Optical Illusion Viral Photo: अलिकडे सोशल मीडियावर असे फोटो फारच व्हायरल होत आहेत. सोशल मीडिया यूजर्सही या फोटोंकडे बघत प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात.
Optical Illusion Viral Photo: अनेक सोशल मीडियावर असे फोटो दिसतात जे डोकं चक्रावून सोडतात. कारण या फोटोंमध्ये जे दिसतं ते तसं नसतं. या फोटोंमध्ये नेमकं काय आहे हे समजून घेण्यासाठी डोक्यावर जोर टाकावा लागतो. अशाच फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illusion) म्हटलं जातं. अलिकडे सोशल मीडियावर असे फोटो फारच व्हायरल होत आहेत. सोशल मीडिया यूजर्सही या फोटोंकडे बघत प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात. असाच एक फोटो सध्या लोकांना हैराण करत आहे.
सोशल मीडियावर तसे तर ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. पण या फोटोची बातच वेगळी आहे. हा फोटो इतर फोटोंपेक्षा जास्त भ्रम निर्माण करणारा आहे. पहिल्यांदा पाहिलं तर फोटो फारच सोपा वाटतो. पण ते तसं नाहीये. बारकाईने बघितलं तर या फोटोत एक प्राणी आणि एक पक्षी आहे. पक्षी तर सहजपणे दिसतो. पण दुसरा प्राणी शोधायला फारच विचार करावा लागतो.
हे इल्यूजन त्या शोधाचा भाग होतं ज्यात रिसर्च करण्यात आला होता की, मनुष्याचं मन किती वेगाने दोन चित्रांमध्ये स्वीच करू शकतो. हे इल्यूजन पहिल्यांदा १९०० मध्ये अमेरिकन मनोवैज्ञानिक जोसेफ जॅस्ट्रो यांनी सादर केलं होतं. २०११ मध्ये प्रकाशित एका रिसर्चमध्ये वैज्ञानिकांनी लिहिलं होतं की, जे लोक ससा आणि बदक यांना बघण्यात लवकर स्वीच करण्यात सक्षम आहेत, ते जास्त क्रिएटिव्ह लोक आहेत.