चॅलेंज! १० सेकंदात शोधून दाखवा फोटोतील एक चूक, भलेभले झालेत फेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 01:14 PM2024-08-12T13:14:46+5:302024-08-12T13:27:52+5:30
Optical Illusion : तुम्ही जर जीनिअस असाल तर नक्कीच या फोटोतील चूक लगेच शोधून काढाल. ही चूक शोधण्यासाठी तुमच्याकडे केवळ १० सेकंदाची वेळ आहे.
Optical Illusion : गेम्स आणि पझल्स सॉल्व करणं सगळ्यांनाच आवडतं. सोशल मीडियावर असे पझल्स आणि गेम्सचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. अनेक ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. जे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. असे फोटो सॉल्व करणं किंवा त्यातील गोष्टी शोधणं सगळ्यांनाच आवडतं. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक चूक शोधायची आहे.
ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही फोटोंमध्ये कधी काही वस्तू, प्राणी, वेगळे नंबर, फरक शोधायचे असतात. तर काही फोटोंमध्ये चुका शोधायच्या असतात. असाच हा फोटो आहे. यात एक चूक आहे जी शोधण्याचं तुम्हाला चॅलेंज आहे. पण हे काम फक्त जीनिअस लोकच करू शकतात. तुम्ही जर जीनिअस असाल तर नक्कीच या फोटोतील चूक लगेच शोधून काढाल. ही चूक शोधण्यासाठी तुमच्याकडे केवळ १० सेकंदाची वेळ आहे.
तुमच्यासमोर असलेल्या फोटोत एक ऑफिस दिसत आहे आणि त्यात दोन पुरूष आणि एक महिला कॉम्प्युटरवर काम करताना दिसत आहे. त्यांच्या मागे तीन मोठ्या खिडक्याही दिसत आहेत. फोटो तसा फारच सामान्य वाटत आहे. पण यात एक चूक आहे. जी तुम्हाला शोधायची आहे.
अशाप्रकारच्या फोटोंमुळे तुमची एखाद्या गोष्टीकडे बघण्याची दृष्टी मजबूत करतात. तसेच अशा फोटोंच्या माध्यमातून मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरतही होते. अनेक तज्ज्ञ सांगतात की, हे फोटो मानसिक आरोग्य चांगलं करण्यासाठी खूप फायदेशीर असतात.
जर तुम्हाला १० सेकंदात या ऑफिसमधील फोटोतील चूक दिसली असेल तर तुम्ही खरंच जीनिअस आहात आणि तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत. मात्र, जर अजूनही यातील चूक दिसली नसेल तर निराशही होऊ नका. कारण या फोटोत काय चूक आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. खालच्या फोटोत ही चूक तुम्ही बघू शकता.
वरच्या फोटोत तुम्ही यातील चूक बघू शकता. फोटोतील चूक ही आहे की, तिन्ही खिडक्यांमध्ये तीन सूर्य दिसत आहेत.