फोटोत मूर्तींमध्ये लपला आहे एक मनुष्य, 10 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 10:25 AM2023-06-19T10:25:00+5:302023-06-19T10:28:00+5:30
Optical Illusion : अशा फोटोंना सॉल्व करण्यासाठी तुम्हाला डोळ्यांसोबतच तर्कशक्तिला देखील कामी लावावं लागतं. तसं तर सगळं काही तुमच्या डोळ्यांसमोरच आहे. पण तुम्हाला फोटो खूप बारकाईने बघावा लागेल.
Optical Illusion Challenge: ऑप्टिकल इल्यूजन म्हणजे डोळ्यांसमोर असा भ्रम निर्माण होतो ज्यात तुम्हाला दिसतं वेगळं आणि असतं वेगळंच. अश फोटोंमधील रहस्य शोधणं किंवा त्यातील फरक शोधणं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतं. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक मनुष्य शोधायचा आहे.
अशा फोटोंना सॉल्व करण्यासाठी तुम्हाला डोळ्यांसोबतच तर्कशक्तिला देखील कामी लावावं लागतं. तसं तर सगळं काही तुमच्या डोळ्यांसमोरच आहे. पण तुम्हाला फोटो खूप बारकाईने बघावा लागेल. तर तुम्ही यातील मनुष्य शोधू शकाल.
Bright Side कडून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. यात तुम्हाला प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार काही मूर्ती दिसत आहेत. या मूर्ती वेगवेगळ्या हावभावासोबत आहेत. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, या मूर्तींमध्ये एक मनुष्य आहे. तुम्हाला 10 सेकंदात यातील मनुष्याला शोधायचं आहे.
तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तर तुम्ही लगेच यातील मनुष्य शोधू शकाल. यासाठी तुम्हाला तुमची तर्कशक्तिही वापरावी लागेल. तेव्हाच तुम्हाला मनुष्य दिसेल. जर अजूनही तुम्हाला यातील मनुष्य दिसला नसेल तर खालच्या फोटोत त्याला तुम्ही बघू शकता.
ज्या लोकांना 10 सेकंदात या फोटोतील मनुष्य दिसला असेल ते खरंच जीनिअस आहेत आणि त्यांचे डोळेही तीक्ष्ण आहेत. पण ज्या लोकांना अजूनही यातील मनुष्य दिसला नाही त्यांच्या उत्तर आम्ही सांगतो. मनुष्य यात घड्याळ बघताना दाखवला आहे. हे काम मूर्ती नाही करू शकत.