Optical Illusion : तुम्हाला तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत असं वाटत असेल तर यातील ससा शोधून दाखवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 09:44 AM2022-11-03T09:44:08+5:302022-11-03T09:47:27+5:30
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जे बघून लोक कन्फ्यूज आणि हैराण होतात. या फोटोंमुळे तुमचं ऑब्जर्वेशन स्कील वाढतं.
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन तेव्हा होतं जेव्हा आपला मेंदू आणि डोळे एकत्र कॉर्डिनेट होत नाहीत. ज्यामुळे भ्रम निर्माण होतो. जेव्हा मेंदू आणि डोळे यांच्यात चुकीचा संचार होतो तेव्हा त्यालाच ऑप्टिकल इल्यूजन म्हटलं जातं. ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जे बघून लोक कन्फ्यूज आणि हैराण होतात. या फोटोंमुळे तुमचं ऑब्जर्वेशन स्कील वाढतं. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक ससा शोधायचा आहे.
या फोटोत तुम्हाला एक कॅम्पस दिसतं. ज्यात तुम्हाला झाडी आणि वेगवेगळ्या प्रकारचं गवत दिसतं. याच झुडपांमध्ये एक ससा लपला आहे. ज्याला तुम्हाला शोधायचं आहे. हा ससा खाण्याच्या शोधात कॅम्पसमध्ये शिरला आहे. या सश्याला शोधण्यासाठी तुमच्याकडे केवळ 13 सेकंदाचा वेळ आहे.
ससा फारच लाजाळू प्राणी आहे. पण तो फार चतुर असतो. त्याचा स्पीडही कमाल असतो. त्यामुळे तुम्हालाही त्याला लगेच शोधायचं आहे.
पहिल्या नजरेत तुम्ही ससा शोधू शकणार नाही. कारण तो झुडपात मिक्स झाला आहे. या सश्याला शोधण्यासाठी तुमची नजर चांगली असली पाहिजे. तसेच डोकंही शांत असलं पाहिजे. तरच तुम्ही यातील ससा शोधू शकाल. जर अजूनही कुणाला यातील ससा दिसला नसेल तर खालच्या फोटोत तो कुठे लपला आहे हे दाखवलं आहे.