Optical Illusion : तुमची नजर तीक्ष्ण आहे असं वाटत असेल तर 'या' फोटोत किती वाघ आहेत शोधा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 04:28 PM2022-04-15T16:28:26+5:302022-04-15T16:37:40+5:30

Optical Illusion Viral Photo : सध्या ट्विटरवर एक असाच ऑप्टिकल इल्यूजन असलेला फोटो व्हायरल झाला आहे. ज्यात तुम्हाला काही वाघ दिसत आहेत. पण यातील गंमत ही आहे की, यात फक्त समोर दिसतात तेवढेच वाघ नाहीयेत.

Optical Illusion : Can you spot all the tigers camouflaged in this picture | Optical Illusion : तुमची नजर तीक्ष्ण आहे असं वाटत असेल तर 'या' फोटोत किती वाघ आहेत शोधा!

Optical Illusion : तुमची नजर तीक्ष्ण आहे असं वाटत असेल तर 'या' फोटोत किती वाघ आहेत शोधा!

googlenewsNext

Optical Illusion Viral Photo : सोशल मीडियावर कधी कशाचा ट्रेन्ड सुरू होईल सांगता येत नाही. सध्या ऑप्टिकल इल्यूजन असलेले अनेक फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले आहेत. एकापेक्षा भ्रम निर्माण करणारे किंवा डोकं चक्रावून सोडणारे हे फोटो यूजर्सनाही आवडतात. कारण यातून त्यांच्या डोक्यालाही चालना मिळते. या फोटोंमध्ये काही प्रश्न किंवा गुपितं दडलेली असतात. ज्याची उत्तरं तुम्हाला द्यायची असतात. 

सोशल मीडियावर नेहमीच गणितासंबंधी काही प्रश्न व्हायरल होत असतात. पण ऑप्टिकल इल्यूजनची बातच वेगळी आहे. या फोटोंमध्ये जे समोर दिसतं ते नसतंच, त्यामागेही आणखी काहीतरी दडलेलं असतं जे शोधावं लागतं. पण तेही काही सोपं काम नाही. बराच विचार करून, बराच वेळ देऊन तुम्ही या फोटोंमध्ये रहस्य उलगडू शकता. काही लोक शांतपणे विचार करून लगेच ही रहस्य उलगडतात तर काही लोक शोधून शोधून थकतात आणि शोधायचा नाद सोडून देतात.

सध्या ट्विटरवर एक असाच ऑप्टिकल इल्यूजन असलेला फोटो व्हायरल झाला आहे. ज्यात तुम्हाला काही वाघ दिसत आहेत. पण यातील गंमत ही आहे की, यात फक्त समोर दिसतात तेवढेच वाघ नाहीयेत. तर काही वाघ हे लपलेले आहेत. त्यांचा रंग फोटोत वेगळा ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ते सहजपणे दिसत नाही.

या फोटोत किती वाघ आहेत हे जर तुम्हाला शोधायचं असेल तर तुम्हाला फोटो शांतपणे आणि बारकाईने बघावा लागेल. अनेकजण तेच करत आहेत. काही लोक १२ उत्तर देत आहेत तर काही लोक १६ म्हणत आहेत. पण तुम्हाला जर वाटत असेल की, तुमच्या नजरेतून काहीच सुटत नाही तर यात किती वाघ आहेत हे तुम्हीच शोधा आणि सांगा.

अशातही जर तुम्ही बराच वेळ शोधूनही तुम्हाला यात नेमके किती वाघ आहेत? याचं उत्तर सापडलं नसेल तर त्यांच्यासाठी खाली उत्तर दिलेलं आहे.

या फोटोत एकूण वाघाचे १८ चेहरे आहेत.
 

Web Title: Optical Illusion : Can you spot all the tigers camouflaged in this picture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.