मोरांच्या गर्दीत लपलं आहे एक फुलपाखरू, 95 टक्के लोक शोधण्यात झाले फेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 02:42 PM2023-06-27T14:42:24+5:302023-06-27T14:46:40+5:30
Optical Illusion : मेंदुसाठीही हे फोटो फार चांगले असतात. कारण यांनी मेंदुचीही कसरत होते. असाच एक फोटो आम्ही पुन्हा घेऊन आलो आहोत.
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो आपलं ऑब्जर्वेशन स्किल टेस्ट करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात. या फोटोंमधील रहस्य किंवा प्राणी शोधण्यात एक वेगळीच मजाही येते. जर तुम्हाला ते शोधणं जमत नसेल तर तुम्ही हे फोटो इतरांसोबत शेअर करून त्यांना चॅलेंजही देऊ शकता. यातून डोळ्यांची टेस्टही होते. मेंदुसाठीही हे फोटो फार चांगले असतात. कारण यांनी मेंदुचीही कसरत होते. असाच एक फोटो आम्ही पुन्हा घेऊन आलो आहोत.
या ऑप्टिकल इल्यूजन फोटोत मोरांचा कळप दिसत आहे. त्यांमध्ये तुम्हाला एक फुलपाखरू शोधायचं आहे. हे चॅलेंज तुम्हाला 6 सेकंदात पूर्ण करायचं आहे. दावा केला जात आहे की, जे लोक फोटोतील फुलपाखरू शोधू शकतील ते खरंच जीनिअस ठरतील.
या फोटोत तुम्हाला भरपूर मोर दिसत आहेत. काही शांतपणे उभे आहेत तर काही पिसारा फुलवून डान्स करण्याच्या तयारीत आहे. फोटोत मोरांच्या वेगवेगळ्या मुद्रा दिसत आहेत. त्यांच्या मधेच एक फुलपाखरू आहे, जे तुम्हाला शोधायचं आहे. पण हे काम इतकंही सोपं नाही. तुम्हाला बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे.
जर 6 सेकंदात तुम्हाला यातील फुलपाखरू दिसलं नसेल तर 10 सेकंदाचा वेळ घ्या आणि मग शोधा. तरीही तुम्हाला दिसलं नसेल तर मग फोटोच्या सेंटरला बारकाईने बघा. तुम्हाला फुलपाखरू दिसेल.