Optical Illusion: एकासारख्या दिसणाऱ्या या फोटोत आहेत 5 फरक, शोधून दाखवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 05:25 PM2023-05-19T17:25:39+5:302023-05-19T17:29:28+5:30

Optical Illusion :  तुमच्यासमोर एकसारखे दिसणारे दोन फोटो आहेत. ज्यात तुम्ही एक परिवार पिकनिकला आल्याचं दिसत आहे. पहिल्यांदा पाहिलं तर फोटो एकसारखे दिसतात.

Optical illusion : Can you spot five differences in this image | Optical Illusion: एकासारख्या दिसणाऱ्या या फोटोत आहेत 5 फरक, शोधून दाखवा!

Optical Illusion: एकासारख्या दिसणाऱ्या या फोटोत आहेत 5 फरक, शोधून दाखवा!

googlenewsNext

(Pic Credit: Info Teaser Youtube) 

Optical Illusion : सोशल मीडियावर वेगवेगळे क्विज आणि गेम्स खेळण्यास मिळतात. फोटोंच्या काही गेम्समध्ये एकतर काही अंतर शोधायचं असतं तर कधी त्यातील चुका काढायच्या असतात. लोकांना असे गेम्स आणि क्विज खेळण्यात फार मजा येते. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत. ज्यात 10 सेकंदात तुम्हाला पाच फरक शोधायचे आहेत. 

तुमच्यासमोर एकसारखे दिसणारे दोन फोटो आहेत. ज्यात तुम्ही एक परिवार पिकनिकला आल्याचं दिसत आहे. पहिल्यांदा पाहिलं तर फोटो एकसारखे दिसतात. पण या फोटोंकडे बारकाईने बघाल तर तुम्हाला पाच फरक दिसून येतील. जे शोधण्यासाठी तुमच्याकडे 10 सेकंदाचा वेळ आहे.

जर तुम्हाला वाटत असेल की, तुमचे डोळे फार तीक्ष्ण आहेत आणि बुद्धी फार तल्लख आहे तर तुम्ही यातील फरक शोधून दाखवा. जर तुम्हाला यातील फरक दिसत नसतीलही तर फार चिंता करण्याची गरज नाही. आम्ही यात तुमची मदत करतो.

पहिला फरक तर तुम्हाला फोटोत उडत असलेल्या चिमणीमध्ये दिसेल. तेच दुसरा फरक तुम्हाला फोटोतील बॅडमिंटन रॅकेटनमध्ये दिसेल. पहिल्या फोटोत रॅकेटसोबत शटल कॉक दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत शटल कॉक नाही. तिसरा फरक तु्हाला दिसेल बॉलजवळ उभ्या असलेल्या मुलाच्या मागे. पहिल्या फोटोत मुलाच्या मागे झाडी दिसत नाहीत तर दुसऱ्या फोटोत झाडी आहेत.

चौथा फरक जी महिला बसली आहे तिच्या स्कर्टमध्ये दिसेल. पहिल्या फोटोत महिलेच्या स्कर्टवर पांढऱ्या रंगाचा गोळा दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत असं नाही. पाचवा फरक तुम्हाला मुलीच्या स्कर्टवर दिसेल. खालच्या फोटोत तुम्हाला उत्तर मिळू शकतं.

Web Title: Optical illusion : Can you spot five differences in this image

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.