जीनिअस असाल तर या फोटोतील 5 फरक शोधून दाखवा, 10 सेकंदात पूर्ण करायचं आहे चॅलेंज!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 02:48 PM2023-05-27T14:48:59+5:302023-05-27T14:52:10+5:30
Optical Illusion : तुमच्यासमोर दोन फोटो आहेत, दोन्हींमध्ये तुम्हाला एक हेअर कटिंग सलून दिसत आहे. दोन्हीही फोटो दिसायला एकसारखे आहेत. पण एकसारख्या दिसणाऱ्या या दोन्ही फोटोंमध्ये पाच फरक आहेत.
Optical Illusion : सोशल मीडियावर तुम्ही नेहमीच वेगवेगळे क्वीज आणि गेम्स खेळत असतात. या फोटोंमध्ये एकतर तुम्हाला फरक शोधायचा असतो किंवा त्यातील चुका शोधायच्या असतात. तर काही फोटोंमध्ये प्राणी शोधायचे असतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना असे क्वीज किंवा गेम्स खेळणं आवडतं. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक गेम घेऊन आलो आहोत ज्यात तुम्हाला पाच फरक शोधायचे आहेत. ज्यासाठी तुमच्याकडे 10 सेकंदाचा वेळ आहे.
तुमच्यासमोर दोन फोटो आहेत, दोन्हींमध्ये तुम्हाला एक हेअर कटिंग सलून दिसत आहे. दोन्हीही फोटो दिसायला एकसारखे आहेत. पण एकसारख्या दिसणाऱ्या या दोन्ही फोटोंमध्ये पाच फरक आहेत. दोन्ही फोटोमध्ये एक महिला दुसऱ्या महिलेचे हेअर कटिंग करताना दिसत आहे. फोटोत एक ड्रेसिंग टेबलही दिसत आहे. टेबलवर काही वस्तू ठेवल्या आहेत. अशात तुम्हाला 10 सेकंदात यातील फरक शोधायचे आहेत.
जर तुम्ही यातील 5 फरक शोधले असतील तर तुम्ही जीनिअस पण आहात आणि तुमचे डोळेही तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही तुम्हाला यातील फरक दिसले तर निराश होण्याची गरज नाही. हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी आम्ही तुमची मदत करतो. चला जाणून घेऊ यातील फरक.
पहिला फरक तुम्हाला जी महिला केस कापवून घेत आहे तिच्या डोळ्यात दिसेल. पहिल्या फोटोत महिला सरळ बघत आहे तेच दुसऱ्या फोटोत ती दुसरीकडे बघत आहे. दुसरा फरक तुम्हाला जी महिला केस कापत आहे तिच्यात दिसेल. पहिल्या फोटोत महिलेच्या हाता कंगवा नाहीये तर दुसऱ्या फोटोत आहे. तिसरा फरक तुम्हाला केस कापणाऱ्या महिलेच्या बेल्टच्या रंगात दिसेल. चौथा फरक तुम्हाला टेबलवर ठेवलेल्या बॉटलच्या संख्येत दिसेल. तर पाचवा फरक तुम्हाला त्याच टेबलखाली निळ्या रंगाच्या वस्तूच्या संख्येत दिसेल.