Optical Illusion: स्वत:ला तुर्रम खाँ समजता? मग या फोटोतील लपलेला प्राणी ५ सेकंदात शोधून दाखवाच!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 04:10 PM2022-09-28T16:10:04+5:302022-09-28T16:14:41+5:30
ऑप्टिकल इल्यूजन म्हणजे नजरेची परीक्षाच असते. पण एक गोष्ट निश्चित आहे की यामुळे तुमच्या मेंदूला चालना मिळते. कोडं सोडवण्यासाठी तुम्ही मेंदूला ताण देता.
ऑप्टिकल इल्यूजन म्हणजे नजरेची परीक्षाच असते. पण एक गोष्ट निश्चित आहे की यामुळे तुमच्या मेंदूला चालना मिळते. कोडं सोडवण्यासाठी तुम्ही मेंदूला ताण देता. आज आम्ही तुमच्यासाठी आणखी एक मजेदार ऑप्टिकल इल्युजन चाचणी घेऊन आलो आहोत. या चित्रात लपलेला प्राणी शोधून दाखवायचा आहे. भल्या भल्यांना यात लपलेला प्राणी शोधताना घाम फुटला आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची दृष्टी इतरांपेक्षा जास्त तीक्ष्ण आहे. तर हे कोडं एकदा सोडवून दाखवाच.
सोशल मीडियाच्या जगात सध्या ऑप्टिकल इल्युजनच्या चित्रांची जोरदार चर्चा आहे. चित्रात एखादी दडलेली गोष्ट शोधण्याचं कसब पणाला लागतं. जे लोकांना सहजासहजी दिसत नाही. त्यासाठी मेंदूला ताण द्यावा लागतो. मग लोकांना कुठेतरी जाऊन दडलेली गोष्ट दिसते. आता हे हत्तीचे हे चित्र पहा. या चित्रात आणखी एक प्राणी आहे जो शोधूनही लोकांना सापडत नाही. तर टास्क असं आहे की जर तुम्हाला ५ सेकंदात प्राणी सापडला तर तुमची नजर नक्कीच तीक्ष्ण आहे. आता खाली दिलेले चित्र काळजीपूर्वक पहा आणि सांगा तो प्राणी कुठे लपला आहे? तुमची वेळ आता सुरू होत आहे आता. मग उशीर कशाचा?
काय मग लपलेला प्राणी सापडला का?
काय झालं? अजून दुसरा प्राणी सापडला नाहीये. हरकत नाही. हा प्राणी सहजासहजी कोणालाच दिसत नाही. आता पुन्हा एकदा चित्र पाहा. तो प्राणी हत्तीभोवती कुठेतरी लपलेला असतो. आता तुम्ही ते पाहिलं असेल. जे अजूनही कोडं सोडवण्यात गुंतलेले आहेत त्यांनी खालील फोटो पाहा. प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल.