या फोटोत लपली आहे एक मांजर, 10 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेजं!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 12:39 PM2023-07-24T12:39:52+5:302023-07-24T12:43:30+5:30
Optical Illusion : जर तुमच्याकडे तीक्ष्ण नजर असेल तरच तुम्ही हे सॉल्व करू शकता. तसेच ऑप्टिकल इल्यूजन ऑब्जर्वेशन स्किल टेस्ट करण्याची एक चांगली पद्धतही आहे.
Optical Illusion Find A Cat: सोशल मीडियावर नेहमीच असे काही फोटो व्हायरल होतात जे तुम्हाला भ्रमात टाकतात. या फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन असं म्हणतात. या फोटोंमधील गुपित शोधणं हे प्रत्येकाला जमेलच असं नाही. जेव्हा अशा फोटोंकडे बारकाईने पाहिलं जातं तेव्हा डोकं चक्रावून जातं. तासंतास त्यातील गुपित लोकांना कळत नाही.
जर तुमच्याकडे तीक्ष्ण नजर असेल तरच तुम्ही हे सॉल्व करू शकता. तसेच ऑप्टिकल इल्यूजन ऑब्जर्वेशन स्किल टेस्ट करण्याची एक चांगली पद्धतही आहे. ऑप्टिकल इल्यूजनमुळे लोकांचं मनोरंजनही होतं. तुम्हाला तुमचं ऑब्जर्वेशन स्किल टेस्ट करायची असेल तर आम्ही एक फोटो घेऊन आलो आहोत. या फोटोत तुम्हाला एक मांजर शोधायची आहे.
तुमच्यासमोर जो फोटो आहे त्यात तुम्हाला एक स्टोर रूम दिसत आहे. रूममध्ये बरंच साहित्य पडलं आहे. याच साहित्यांमध्ये एक मांजर लपली आहे. त्यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंदाची वेळ आहे.
जर तुम्हाला 10 सेकंदात यातील मांजर दिसली तर तुम्ही जीनिअस आहात. जर दिसली नसेल तर निराश होऊ नका. कारण ती शोधण्यात आम्ही तुमची मदत करू.
फोटोत मांजर अगदी तुमच्या नजरेसमोर आहे. या मांजरीला खूप हुशारीने लपवण्यात आलं आहे. त्यामुळे भलेभले लोक तिला शोधण्यात अपयशी ठरले. जर तुम्ही बारकाईने बघाल तरच तुम्हाला यातील मांजर दिसू शकेल. तुम्ही खुर्चीखाली मांजर बघू शकता. नसेल दिसली तर खालच्या फोटोत बघू शकता.