मूर्तींमध्ये लपला आहे एक मनुष्य, 9 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 01:36 PM2023-12-26T13:36:47+5:302023-12-26T13:39:18+5:30

एक भ्रम निर्माण करणारा फोटो सध्या व्हायरल होत आहे. ज्यातील रहस्य शोधण्यात जास्तीत जास्त लोक अपयशी ठरत आहेत.

Optical Illusion : Can you spot human among statues in the picture within 9 second | मूर्तींमध्ये लपला आहे एक मनुष्य, 9 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

मूर्तींमध्ये लपला आहे एक मनुष्य, 9 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

Brain Teaser for Testing IQ:  सोशल मीडियावर आजकाल अनेक ऑप्टिकल इन्यूजन असलेले फोटो व्हायरल होत असतात. यांद्वारे मेंदू आणि डोळे दोन्हींची टेस्टही होते. सोबतच तुमचं मनोरंजनही होतं. अशा फोटोंमधील रहस्य शोधणं लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं. असाच एक भ्रम निर्माण करणारा फोटो सध्या व्हायरल होत आहे. ज्यातील रहस्य शोधण्यात जास्तीत जास्त लोक अपयशी ठरत आहेत.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणारे असतात. यात कधी काही शोधायचं तर कधी यातील चुका शोधायच्या असतात. अनेकदा तर हे फोटो इतक्या हुशारीने तयार केले जातात की, तासंतास यातील रहस्य शोधता येत नाही. तुमच्यासाठी जो फोटो आम्ही घेऊन आलो आहोत त्यात काही मूर्तींमध्ये एक मनुष्य लपला आहे. 

तुमच्या समोर असलेल्या फोटोत वेगवेगळ्या पोजमध्ये काही मूर्ती आहेत. काही बसलेल्या आहेत. गार्डनमध्ये असलेल्या या मूर्तीमध्ये एक ट्विस्ट आहे. यात एक मनुष्यही आहे. हा मनुष्य तुम्हाला शोधायचा आहे. ज्यासाठी तुम्हाला चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे. यासाठी तुमच्याकडे 9 सेकंदाची वेळ आहे.

9 सेकंदात तुम्ही यातील मनुष्य शोधला असेल तर तुम्ही खरंच जीनिअस आहात. जर अजूनही दिसला नसेल तर निराश होऊ नका. त्याला शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत  तुम्ही त्याला बघू शकता. 

Web Title: Optical Illusion : Can you spot human among statues in the picture within 9 second

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.