जर स्वत:ला तुम्ही जीनिअस समजत असाल तर 10 सेकंदात शोधून दाखवा यातील चूक!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 09:47 AM2023-07-15T09:47:59+5:302023-07-15T09:49:10+5:30

Optical Illusion : तुमच्यासमोर जो फोटो आहे त्यात एक मुलगी सिंकसमोर उभी राहून भांडी घासताना दिसत आहे. फोटोत तसं तर सगळं सामान्य दिसत आहे. पण या फोटोकडे बारकाईन बघाल तर तुम्हाला एक चूक दिसून येईल.

Optical illusion : Can you spot mistake in 10 second challenge | जर स्वत:ला तुम्ही जीनिअस समजत असाल तर 10 सेकंदात शोधून दाखवा यातील चूक!

जर स्वत:ला तुम्ही जीनिअस समजत असाल तर 10 सेकंदात शोधून दाखवा यातील चूक!

googlenewsNext

Optical Illusion : सोशल मीडिया असे अनेक फोटो समोर येत असतात जे बघून लोक संभ्रमित होतात. अशा फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन फोटो म्हटलं जातं. या फोटोंच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन होतं आणि मेंदुची कसरतही होते. त्यामुळे लोक अशा फोटोंवर बराच वेळ घालवतात. यातील काही फोटोंमध्ये तुम्हाला प्राणी किंवा वस्तू शोधायच्या असतात. तर काही फोटोंमध्ये चुका शोधायच्या असतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

तुमच्यासमोर जो फोटो आहे त्यात एक मुलगी सिंकसमोर उभी राहून भांडी घासताना दिसत आहे. फोटोत तसं तर सगळं सामान्य दिसत आहे. पण या फोटोकडे बारकाईन बघाल तर तुम्हाला एक चूक दिसून येईल. पण ही चूक शोधण्यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंदाची वेळ आहे. 

ज्यांचे डोळे तीक्ष्ण असतील आणि जे जीनिअस असतील त्यांनी यातील चूक नक्कीच वेळेत शोधली असेल. पण ज्यांना अजूनही यातील चूक दिसली नसेल तर निराश होऊ नका. ती शोधण्यात आम्ही तुम्हाला मदत करतो.

या फोटोत सगळं काही सामान्य दिसत आहे. पण जेव्हा तुम्ही सिंकवरील पाण्याची टाक्यावर नजर टाकाल तर सिंकच्या पाईपच्या एका बाजूला बल्ब लावलेला दिसेल. सिंकच्या टाकीवर बल्बचं काय काम ना?

Web Title: Optical illusion : Can you spot mistake in 10 second challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.