केवळ जीनिअस लोकच 12 सेकंदात शोधू शकतील फोटोतील वेगळा नंबर, तुम्हीही ट्राय करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 12:24 PM2024-08-29T12:24:44+5:302024-08-29T12:35:32+5:30
Optical Illusion : तुमच्या समोर असलेल्या फोटोत तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे. यात तुम्हाला सगळीकडे 888 असा नंबर दिसत आहे.
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. हे फोटो आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करत असतात. म्हणजे या फोटोंमधील गोष्टी अशा पद्धतीने लपवलेल्या असतात की, त्या सहजपणे दिसून येत नाहीत. त्या शोधण्यासाठी तुम्हाला नेहनत घ्यावी लागते. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी यांमध्ये तुम्हाला प्राणी किंवा वस्तू शोधायच्या असतात तर कधी यात तुम्हाला चुका किंवा वेगळे नंबर शोधायचे असतात. तुमच्या समोर असलेल्या फोटोत तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे. यात तुम्हाला सगळीकडे 888 असा नंबर दिसत आहे. पण यात केवळ हाच नंबर नसून एक वेगळा नंबरही आहे. तो तुम्हाला 12 सेकंदात शोधायचा आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची खासियत म्हणजे या फोटोंच्या माध्यमातून तुमचं मनोरंजन तर होतंच सोबतच तुमचा मेंदू आणि डोळ्यांची देखील कसरत होते. कारण यातील गोष्टी शोधण्यासाठी तुम्हाला बरीच मेहनत घ्यावी लागते. तेव्हाच तुम्हाला यातील गोष्टी सापडतात. आणखी एक खास बाब म्हणजे याद्वारे तुमची आयक्यू टेस्टही होते.
जर तुम्हाला ठरलेल्या वेळेत म्हणजे 12 सेकंदात या फोटोतील वेगळा नंबर दिसला असेल तर तुमचं अभिनंदन. मात्र, जर अजूनही तुम्हाला यातील वेगळा नंबर सापडला नसेल तर निराश होण्याचं देखील काम नाही. कारण तो शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही यातील वेगळा नंबर बघू शकता.
वरच्या फोटोत वेगळा नंबर सर्कल केला आहे.