समुद्राच्या तळाशी हरवला आहे एक शूज, भले भले थकले; बघा तुम्हाला तरी दिसतो का!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 12:15 PM2023-06-08T12:15:52+5:302023-06-08T12:17:45+5:30

Optical Illusion : यातून टाइमपास तर चांगला होतोच सोबतच तुमच्या डोळ्यांची टेस्टही होते. पण यासाठी तुम्हाला बरीच मेहनत करावी लागते. तेव्हाच तुम्हाला हे सॉल्व करण्यात यश मिळेल. 

Optical illusion : Can you spot shoe is hidden in depth of sea | समुद्राच्या तळाशी हरवला आहे एक शूज, भले भले थकले; बघा तुम्हाला तरी दिसतो का!

समुद्राच्या तळाशी हरवला आहे एक शूज, भले भले थकले; बघा तुम्हाला तरी दिसतो का!

googlenewsNext

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन चॅलेंज केवळ तुमच्या बुद्धीला चालना देण्यासाठी किंवा तुमची आयक्यू लेव्हल टेस्ट करण्यासाठी नाही तर तुमच्यासाठी हा एक मजेदार खेळही असतो. ज्याने तुमचं मनोरंजनही होतं. यातून टाइमपास तर चांगला होतोच सोबतच तुमच्या डोळ्यांची टेस्टही होते. पण यासाठी तुम्हाला बरीच मेहनत करावी लागते. तेव्हाच तुम्हाला हे सॉल्व करण्यात यश मिळेल. 

असाच एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात समुद्राच्या तळाशी एक शूज हरवला आहे. जो तुम्हाला शोधायचा आहे. फोटोत स्वीमिंग करताना एका मुलाचा शूज कुठेतरी हरवला आहे. जो कुणालाच सापडत नाहीये. हा शूज तुम्हाला 7 सेकंदात शोधायचा आहे.

या फोटोत तुम्ही बघू शकता की, काही मुलं समुद्राच्या तळाशी स्वीमिंग करताना दिसत आहेत. यादरम्यान एका मुलाचा शूज स्वीमिंग करता करता कुठेतरी हरवतो. जो कुणालाच दिसत नाहीये. मुलं आणि मुली तो शूज शोधत आहेत. अशात तुमच्याकडे 7 सेकंदाचा वेळ आहे. पण त्याला शोधणं काही सोपं काम नाही.

मुलाचा शूज पायातून निसटला आणि एका जागी जाऊन फसला. जिथे कुणाचीही नजर गेली नाही. त्यामुळे त्याला शोधणं फार अवघड काम आहे. पण तुम्हाला जर शूज शोधायचा असेल तर तुम्हाला समुद्राच्या तळाशी पडलेल्या वस्तूंमध्ये शूज शोधावा लागेल. होऊ शकतं एखाद्या झुडपात जाऊन तो अडकला असेल. इतकी हिंट दिल्यावर तुम्ही नक्कीच शूज शोधू शकाल असं वाटतं. जर अजूनही शूज सपडला नसेल तर खालच्या फोटोत उत्तर बघू शकता.

Web Title: Optical illusion : Can you spot shoe is hidden in depth of sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.