या फोटोतील बिबट्या शोधून शोधून थकले लोक, बघा तुम्हाला तरी दिसतो का!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 10:21 AM2023-07-20T10:21:43+5:302023-07-20T10:23:07+5:30

Optical Illusion : बरेच लोक डोकं खाजवत बराच वेळ हे फोटो बघतात पण त्यांना यातील गोष्टी काही सापडत नाहीत. तुमच्या समोर असलेला फोटो फोटोग्राफर सौरभ देसाई यांनी पोस्ट केला आहे.

Optical Illusion : Can you spot snow leopard hidden in this picture | या फोटोतील बिबट्या शोधून शोधून थकले लोक, बघा तुम्हाला तरी दिसतो का!

या फोटोतील बिबट्या शोधून शोधून थकले लोक, बघा तुम्हाला तरी दिसतो का!

googlenewsNext

Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच यूजर्सना भ्रमात टाकणारे फोटो व्हायरल होत असतात. त्यांना ऑप्टिकल इल्यूजन असं म्हटलं जातं. हे फोटो लोकांचं मनोरंजन करतात आणि त्यांच्या मेंदुची कसरतही करतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक बिबट्या शोधायचा आहे. 

बरेच लोक डोकं खाजवत बराच वेळ हे फोटो बघतात पण त्यांना यातील गोष्टी काही सापडत नाहीत. तुमच्या समोर असलेला फोटो फोटोग्राफर सौरभ देसाई यांनी पोस्ट केला आहे. बर्फवृष्टीनंतर डोंगरावर पडलेल्या बर्फाजवळ एक बिबट्या दिसला, तो फोटोग्राफरशिवाय कुणीही सहजपणे शोधू शकला नाही.

त्यांनी हा खास फोटो शेअर करत लिहिलं की, 'हे हिम बिबट्यांचे फोटो खूप दूरपर्यंत पोहोचले आहेत आणि मला आनंद आहे की, लोकांना या फोटोत बिबट्या शोधण्यात मजा येत आहे'. त्यांनी #findthesnowleopard आणि #snowleopard हॅशटॅग दिले. पहिल्या फोटोत डोंगरात एक बिबट्या लपला आहे. तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या नजरेतून काहीच सुटत नाही तर लगेच बिबट्याला शोधायला लागा.

या फोटोत बिबट्या एका रिकाम्या जागेवर लपलेला दिसत आहे. इतर आश्चर्यजनक फोटोचा आनंद घेण्यासाठी फोटोग्राफर द्वारे शेअऱ केलेले फोटो स्वाइप करून बघू शकता. हे फोटो पाहिल्यावर तुमच्या तोंडून 'वाह' असंच निघेल. हे फोटो इन्स्टाग्रामवर @saurabh_desai_photography नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आले आहेत.

Web Title: Optical Illusion : Can you spot snow leopard hidden in this picture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.