Optical Illusion : 'या' फोटोत आहेत ७ मनुष्य पण लोकांना दिसले केवळ ३; बघा तुम्हाला किती दिसतात!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 04:22 PM2022-04-20T16:22:17+5:302022-04-20T16:27:10+5:30
Optical Illusion Viral Photo : हा फोटो तयार करणाऱ्याने दावा केला आहे की, हा फोटो बघून यात तुम्हाला किती मनुष्य दिसतात त्यावरून कळेल तुमची मेंटल हेल्थ कशी आहे.
Optical Illusion Viral Photo : सोशल मीडियावर अलिकडे ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंच्या माध्यमातून लोक आपल्या नजरेची परीक्षा घेतात. आता एक असा फोटो व्हायरल झाला आहे, जो सांगले तुमच्या मेंदूची सध्या काय स्थिती आहे. हा फोटो तयार करणाऱ्याने दावा केला आहे की, हा फोटो बघून यात तुम्हाला किती मनुष्य दिसतात त्यावरून कळेल तुमची मेंटल हेल्थ कशी आहे.
पेन्सिलने तयार करण्यात आलेल्या या ड्रॉइंगला सर्वातआधी डार्कसॅंडी नावाच्या यूजरने शेअर केलं होतं. त्याने लिहिलं की, जर तुम्हाला या फोटोत सात मनुष्य आणि एक मांजर दिसत असेल तर याचा अर्थ आहे की, तुमचा मेंदू सतर्कपणे काम करतो. तेच जर तुम्हाला यात केवळ ६ मनुष्य दिसत असेल तरीही तुमचा मेंदू योग्यप्रकारे काम करत आहे. पण जर यात तुम्हाला दोन किंवा तीनच मनुष्य दिसत असतील तर मग चिंतेचा विषय आहे.
हा ऑप्टिकल इल्यूजन फोटो शेअर केल्यावर लोक त्यांच्या मेंदूची क्रिया तपासून बघत आहेत. काही लोकांना लगेच या फोटोत सात मनुष्य आणि एक मांजर दिसली, पण बऱ्याचा लोकांना हे शोधण्यात अडचण आली. एका व्यक्तीने लिहिलं की, यातील सात मनुष्य आणि १ मांजर शोधण्यासाठी त्याला तीन मिनिटे लागली. तेच काही जास्तच तीक्ष्ण नजर असलेल्या लोकांना यात इतरही काही प्राणी दिसले. जसे की, बदक, कुत्रा आणि उंदीर.
या फोटोवर अनेका लोकांनी कमेंट्स केल्या. असे अनेक यूजर होते ज्यांना या फोटोत मनुष्य तर दिसले, पण मांजर दिसली नाही. तेच काही लोकांनी मांजरीला शोधता शोधता उंदीर दिसल्याचा दावा केला. काही लोक म्हणाले सात मनुष्य शोधणं सोपं काम होतं. बघा तुम्हाला किती दिसतात.
ज्यांना फोटोत सात मनुष्य काय काहीच दिसलं नाही त्यांच्यासाठी हा फोटो....